शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

Guru purnima 2021 : सादरीकरणाच्या मंचाला 'व्यासपीठ' हे नाव कसे पडले याची सविस्तर माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 15:34 IST

Guru purnima 2021 : आजच्या काळात आदर्श गुरु आणि आदर्श शिष्य मिळणे कठीण आहे. ज्ञानाची, अध्यात्माची, परमेश्वर प्राप्तीची तळमळ फारच कमी गुरुशिष्यांमध्ये आढळते.

आषाढी एकादशीनंतर चार दिवसांनी येणारा सण म्हणजे गुरुपौर्णिमा. बालपणापासून आपण हा सण साजरा करत आलो आहोत. यंदा २३ जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. जाणून घेऊया या पारंपरिक सणाची माहिती.

या दिवशी महर्षी व्यासांनी पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतला, अशी आपली श्रद्धा आहे. त्यामुळे संन्यासी मंडळी या दिवशी व्यासांची पूजा करतात. त्यासाठी स्नानदी नित्यकर्मानंतर संकल्पपूर्वक एक सुती धूतवस्त्र अंथरतात. त्याच्यावर गंधाने पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा बारा रेषा काढतात. हेच व्यासपीठ! त्यावर ब्रह्मा, विष्णू, वसिष्ठ, पराशर, शक्ती, व्यास, शुक्रदेव, गौडपाद, गोविंदस्वामी आणि शंकराचार्य यांना आवाहन केले जाते. त्यानंतर त्यांची विधीवत कृतज्ञतापूर्वक पूजा करतात. दक्षिणेकडील शंकरपीठांमध्ये या दिवशी महोत्सवच असतो. 

ही विधीवत पद्धत आज अनेकांना माहित नसली, तरीदेखील कलासादरीकरणाला वाव देणाऱ्या व्यासांना स्मरून सादरीकरण मंचाला व्यासपीठ हे नाव दिले गेले. आजही कलाकार, वक्ते, व्याख्याते, कीर्तनकार, प्रवचनकार, त्या व्यासपीठाला वंदन करून मगच सादरीकरणाला सुरुवात करतात.

व्यास हे अखिल जगाचे गुरु आहेत. आपल्या संस्कृतीची मूळ संकल्पना ही व्यासांचीच आहे. त्यांनीच तिची जोपासना केली. व्यास आपले धर्म अध्यात्म वाङमय अशा सर्व विषयातील गुरु आहेत. त्यामुळे संस्कृती व्यासांचे असे कृतज्ञतापूर्वक स्मरण करते. याच दिवशी आपल्या मातापित्यांची आणि गुरुंची पूजा करण्याची प्रथा ओ. निष्ठावान शिष्य आणि आदर्श गुरु यांचे परस्परांशी असलेले नाते अन्य मंडळींना कळणारे नसते. शिष्याला आपला गुरु हा देवाहूनही श्रेष्ठ असतो. तर शिष्याला भवसागरातं पैलपार नेण्याची शक्ती केवळ गुरुंपाशीच असते. 

आजच्या काळात आदर्श गुरु आणि आदर्श शिष्य मिळणे कठीण आहे. गुरुंकडे ज्ञान असले तरी शिष्याकडे शिकण्याची ओढ नसते  किंवा शिष्याची शिकायची तयारी असली, तरी त्याला योग्य गुरुंची साथ लाभत नाही. आजचे गुरु शिष्य व्यवहारी जगात अडकले आहेत. परंतु ज्ञानाची, अध्यात्माची, परमेश्वर प्राप्तीची तळमळ फारच कमी गुरुशिष्यांमध्ये आढळते.

तरीही अजूनही काही गुरुशिष्यांची जोडी अशी आहे, ज्यांनी अजूनपर्यंत या नात्याचे पावित्र्य जपत गुरुशिष्य परंपरा अबाधित ठेवली आहे. व्यासपीठाचा मान राखला आहे. या निमित्ताने आपणही आपल्या आयुष्याला वळण देणाऱ्या गुरुंचा मान राखुया. त्यांना गुरुदक्षिण देऊया आणि दत्त गुरुंचे दर्शन घेऊन गुरुपौर्णिमा साजरी करूया. 

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमा