शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जन्मापासून मुक्त होणे म्हणजेच नैसर्गिकपणे मृत्यूपासून मुक्ती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 17:31 IST

अध्यात्मिक प्रक्रिया ही तुमच्याबद्दल आहे, जे की जीवन नाही आणि मृत्यूही नाही. अध्यात्मिक प्रक्रिया ही मृत्यबद्दल नाही - तुम्ही अश्या गोष्टीच्या शोधात असता ज्या मृत्यूहूनही खोल आहे. मृत्यूही सांसारिक गोष्ट आहे,

सद्गुरू: मृत्यू हा बहुतेक लोकांसाठी जीवनाचा सर्वात प्रगल्भ आणि गूढ पैलू आहे कारण लोकांनी कोणत्याही गोष्टी ऐकल्या तरीही त्यांना ते काय आहे हे उमजत नाही. विज्ञान आणि तत्त्वज्ञानही मृत्यू काय आहे हे उलगडू शकले नाहीत.  शरीर जीवन आणि मृत्यू आहे- अध्यात्मिक प्रक्रिया ही तुमच्याबद्दल आहे, जे की जीवन नाही आणि मृत्यूही नाही. अध्यात्मिक प्रक्रिया ही मृत्यबद्दल नाही - तुम्ही अश्या गोष्टीच्या शोधात असता ज्या मृत्यूहूनही खोल आहे. मृत्यूही सांसारिक गोष्ट आहे, त्याबद्दल प्रगल्भ किंवा गूढ असे काहीही नाही. ही अशी गोष्ट आहे जी लोकांबरोबर कायम घडत आली आहे. मृत्यू प्रगल्भ आणि गूढ वाटतो कारण “शॉर्ट टर्म मेमरी लॉस” (स्मरणशक्तीची कमजोरी). जर तुमची स्मरणशक्ती अशी असेल की दररोज सकाळी उठल्यावर तुम्हाला मागील दिवस आठवत नाही, तुम्हाला आठवत नाही की तुम्ही खरोखर झोपी गेला होता, तुम्हाला फक्त एवढेच माहिती आहे की तुम्ही जागे झाले आहात, मग दररोज , असे वाटेल की तुम्ही एक जादुई दुनियेत आहात आणि हे सर्वात रहस्यमय असेल. काही तासांची झोप ही तुमच्या जीवनातील सर्वात रहस्यमय आणि सखोल पैलू ठरली असती कारण तुम्हाला आठवत नसेल की तुम्ही खरोखर झोपलात आणि मग जागे झालात. मृत्यूचे गूढ आणि प्रगल्भता अशीच आहे.जेव्हा आपण असं म्हणतो "शिव हा विनाशक आहे. " आपण असे म्हणत नसतो की तो म्हणजे मृत्यू. त्याला मृत्यू मध्ये काहीही रस नाही. त्याच्यासाठी जन्म घेणे आणि मरण पावणे या फारच सांसारिक गोष्टी आहेत, जीवनाचा फार वरवरचा पैलू. तो त्याच्या अंगावर स्मशानातील राख लावून घेतो याचे एक कारण म्हणजे त्याला दाखवायचे आहे की त्याला मृत्यूचा तिटकारा आहे. तो त्याच्याकडे प्रगल्भ किंवा गूढ म्हणून बघत नाही. अध्यात्मिक साधना ही मृत्यूबद्दल नाही. ही मृत्यूच्या मुळापासून जे की जन्म आहे त्यापासून मुक्त होण्याबद्दल आहे. जन्मापासून मुक्त होणे म्हणजेच नैसर्गिकपणे मृत्यूपासून मुक्त होणे.जन्म आणि मृत्यू हा केवळ कुंभाराचा व्यवसाय आहे - पृथ्वीचा तुकडा उचलणे, त्याला मानवी स्वरुपात आकार देणे आणि तो चालवणे आणि बोलवणे. काही काळानंतर कठपुतळीत बदलणारा हा कुंभाराचा व्यवसाय हा एक साधा खेळ आहे. प्रेक्षकांच्या दृष्टीकोनातून नाटक जाणून घेणे ही एक गोष्ट असते. स्टेजच्या मागून नाटक जाणून घेणे पूर्णपणे भिन्न आहे. एकदा तुम्ही बॅकस्टेजवरुन नाटक पहायला सुरुवात केली की काही वेळाने तुम्हाला ते नकोसे होते. तुम्ही कदाचित त्यातील यांत्रिकीचा आनंद घ्याल परंतु तुम्हाला त्यातील कथेत काही उत्साह वाटणार नाही. कारण हे सर्व कसे एकत्र केले जाते हे तुम्हाला माहित असते. केवळ ज्यांच्याकडे अल्पकालीन स्मृती आहे - दररोज ते एकाच नाटकात येऊन बसतात परंतु मागील दिवसाची आठवण त्यांनी विसरली आहे - त्यांच्यासाठी ते खूप रोमांचक आणि आव्हानात्मक आहे. तर अध्यात्मिक प्रक्रिया ही जीवन मरणाबद्दल नाही.शरीर जीवन आणि मृत्यू आहे- अध्यात्मिक प्रक्रिया ही तुमच्याबद्दल आहे, जे की जीवन नाही आणि मृत्यूही नाही.