शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल, डिझेल गॅस दरवाढीविरोधात युवक काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम सुरू - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:38 IST

गेवराई : पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक व बीड जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने एक कोटी ...

गेवराई : पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक व बीड जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने एक कोटी स्वाक्षरी अभियान राबवून केंद्र सरकारचे लक्ष वेधून ही भाववाढ कमी करावी या मागणीसाठी बीड जिल्हाभरात आंदोलन सुरू करण्यात आले असल्याची माहिती युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड श्रीनिवास बेदरे यांनी दिली आहे. शहराजवळील कॅप्टन कृष्णकांत पेट्रोल पंप येथे या स्वाक्षरी मोहिमेचा प्रारंभ युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. श्रीनिवास बेदरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रभारी राहुल संत व विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गेवराई यासह संपूर्ण जिल्हाभरात १२ ते १५ जुलै दरम्यान स्वाक्षरी अभियान राबविले जाणार असून, बीड जिल्ह्यामध्ये तीन लक्ष सह्यांचे निवेदन करून केंद्र सरकारविरोधात राष्ट्रपती यांना दिले जाणार आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला झळ देऊन भांडवलदारांना मोठे करण्याचे काम भारतीय जनता पक्ष करीत आहे. दोन कोटी नोकऱ्या, १५ लाख यांचे विविध आश्वासने हवेत विरली आहेत. आता महाराष्ट्रातील व देशातील तरुणांमध्ये या सरकारविरुद्ध मोठा असंतोष असून, येत्या आठवडाभरामध्ये प्रत्येक तालुक्यातील शहराच्या ठिकाणी ही सह्यांची मोहीम राबविली जाणार असून, तीन लक्ष सह्यांचे निवेदन राष्ट्रपती महोदयांना दिले जाणार असल्याचे श्रीनिवास बेदरे म्हणाले. यावेळी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष किरण अजबकर, बळिराम गिराम, योगेश बोबडे, जिजा जगताप, नीलेश माळवे, शेख खुदुस, गोटू सावंत, राजू पोळघट, आदी यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर उपस्थित होते. याप्रसंगी युवक काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

120721\4332sakharam shinde_img-20210712-wa0045_14.jpg