शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमप्रकरणातून लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणीने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:35 IST

विशाल शिंदे नेकनूर (जि.बीड) : बीड तालुक्यातील मांजरसुंबा घाटामध्ये एका नर्सने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २६ जुलै ...

विशाल शिंदे

नेकनूर (जि.बीड) : बीड तालुक्यातील मांजरसुंबा घाटामध्ये एका नर्सने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २६ जुलै रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली होती. ही आत्महत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचे समोर आले असून, एकाविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनाली अंकुश जाधव ( रा.पालवण रोड, शिवाजीनगर, बीड) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सोनालीचे बारावीपर्यंत शिक्षण झालेले आहे. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर तिचा विवाह तिच्या मामाच्या मुलासोबत २०१२ मध्ये झाला होता; मात्र काही कारणास्तव ती पतीपासून विभक्त राहत होती. ती बीड शहरातील एका खासगी रुग्णालयात नर्स होती. दरम्यान, लॅब टेक्निशियन असलेल्या अक्षय राजाभाऊ आव्हाड (रा.स्वराज्यनगर, बीड) याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते. अक्षय हा विवाहित असून, त्याला दोन मुले देखील आहेत; मात्र सोनाली त्याला विवाह करण्याची मागणी करत होती. आपला विवाह झाल्याचे अक्षयने लपवून ठेवले होते. अक्षय याने विवाह करण्यास नकार दिला. याच कारणावरून सोनाली जाधव हिने मांजरसुंबा घाटातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका लिंबाच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह पाठवला होता. याप्रकरणी सोनाली आत्महत्याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात अक्षय आव्हाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणे प्रमुख सपोनि लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किशोर काळे तपास करत आहेत.

लग्नासाठी झाली होती बोलणी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लॅब टेक्निशियन अक्षय आव्हाड आणि सोनाली जाधव यांच्या प्रेमसंबंधाविषयी दोन्हीकडील मंडळीला माहिती होती. काही दिवसांपूर्वी अक्षयचे वडील राजाभाऊ आव्हाड हे सोनालीच्या घरी गेले होते. ती देखील त्याच्या घरी गेली होती, बोलणी सुरु असतानाच सोनालीचा भाऊ अजय जाधव याला त्याच्या मामाने माहिती दिली की, अक्षयचा विवाह झाला असून, त्याला दोन मुलं देखील आहेत. त्याची माहिती घेऊन पुढील निर्णय घ्यावा. दरम्यान, अक्षय याने ही बोलणी झाल्यानंतर सोनालीला विवाहास नकार दिला. त्यामुळे ती नैराश्यात होती. यातूनच तिने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.