लोकमत न्यूज नेटवर्क
धारुर : शहरातील तरुण व्यापाऱ्याने बुधवारी भरदुपारी त्याच्या मोबाईल शॉपीच्या कॅबिनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. धनंजय शिरीष पिलाजी (३८) असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी पेठ विभागातील एसबीआयच्या शाखेतून दोन लाख रुपये काढल्याची माहिती मिळाली असून, धारुर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील मुख्य रस्त्यावर बसस्थानकाजवळच धनंजय पिलाजी यांचे श्रीकांत जनरल स्टोअर्स व मोबाईल सेंटर आहे. बुधवारी नेहमीप्रमाणे त्यांनी आपले दुकान उघडले. सर्व सुरळीत सुरू असताना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मोबाईल सेंटरमध्ये मागील बाजूस असलेल्या कॅबिनमध्ये धनंजय पिलाजी यांनी पंख्याला दोरीने गळफास घेतला. ही घटना बारा ते सव्वाबाराच्या सुमारास दुकानात गेलेल्या ग्राहकाच्या लक्षात आली. त्याचवेळी शेजारचे व्यापारी व नागरिक जमा झाले. ही वार्ता शहरात पसरताच मित्र व चाहत्यांची दुकानासमोर मोठी गर्दी झाली होती. ही घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून गर्दी पांगविली. याप्रकरणी मृत धनंजयच्या भावाने दिलेल्या खबरेवरून धारुर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. वृत्त लिहिपर्यंत या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
-----------
या आत्महत्येचा तपास पोलीस करीत असून मृत धनंजय हा सकाळपासून अनेकांना भेटला होता. पेठ विभागातील एसबीआय बँकेच्या शाखेत जाऊन आला होता. जवळपास दोन लाख रुपये धनंजयने त्याच्या खात्यातून काढल्याचे सांगण्यात आले. एसबीआयचे शाखा व्यवस्थापक विनोदकुमार यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. तर मोबाईल शॉपीमधील सीसीटीव्ही बंद असल्याचे पोलिसांना दिसून आले. तर पोलीस योग्य दिशेने तपास करीत असल्याचे पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांनी सांगितले.
===Photopath===
230621\fb_img_1624438425830.jpg
===Caption===
धारूर शहरातील तरून व्यापारी धंनजय पिलाजी