शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षांत दगडवाडी, खजेवाडीत कोरोनाचा एकही रुग्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:24 IST

पॉझिटिव्ह स्टोरी अविनाश मुडेगावकर लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : तालुक्यातील दगडवाडी आणि खजेवाडी या दोन गावांनी गेल्या दीड ...

पॉझिटिव्ह स्टोरी

अविनाश मुडेगावकर

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : तालुक्यातील दगडवाडी आणि खजेवाडी या दोन गावांनी गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाला वेशीबाहेर रोखण्याचा पराक्रम करून दाखवला आहे. कारण या गावात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. यामुळे प्रशासनाकडूनदेखील या ग्रामस्थांचे कौतुक होत आहे.

कोरोना संसर्गामुळे अख्खं जग अडचणीत आले असतानाही तालुक्यातील दगडवाडी आणि खजेवाडी येथील ग्रामस्थ सतर्क राहिले. सरकारी नियमांचे तंतोतंत पालन, स्वच्छता आणि प्रबोधन या त्रिसूत्रीमुळे गेल्या दीड वर्षात पाचशेच्या आत लोकसंख्या असलेल्या या गावातील एकही कोरोनाबाधित आढळला नाही. ही किमया दगडवाडी, खजेवाडी या गावाने साधली आहे. या गावाने निसर्गावर एवढे अमाप प्रेम केल्याने गावात २४ तास शुद्ध हवा, पक्ष्यांचा किलबिलाट असे निसर्गरम्य चैतन्यमयी वातावरण असते.

....

...अशी घेतली जाते काळजी

कोरोनाचा धोका सुरू झाल्यापासून ग्रामस्थांनी कोरोना म्हणजे काय? याची माहिती करून घेतली. शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन सुरू केले. गावात प्रत्येकाच्या तोंडावर मास्क दिसतो. प्रत्येकजण सोशल डिस्टन्सचे पालन करताना दिसतो. नेहमीप्रमाणेच ग्रामस्थ शेतात कामे करतात. योग्यरितीने सॅनिटाईज करून किराणा व इतर सामानाचा वापर होतो. रोज दूध, ताजी फळे, भाजीपाला गावातच मिळतो. त्यामुळे सकस ताजा आहार, शुद्ध हवा आणि कोरोना नियमांचे पालन यामुळे दगडवाडी आणि खजेवाडी येथील ग्रामस्थांनी कोरोनाला गावात एन्ट्रीच करू दिलेली नाही.

....

बाहेरील लोकांना प्रवेशबंदी

ग्रामपंचायतीने गावाबाहेरील लोकांना प्रवेशबंदी केली. आवश्यक वाटल्यास थोड्या वेळासाठी परवानगी दिली. कोरोनाविषयी जागृती केली. सुरक्षित अंतर, मास्क वापरणे आदी मूलभूत नियम पाळण्यात आले. अशी माहिती दगडवाडीचे सरपंच गंगाबाई कुंडगर व माजी सरपंच मारोती तुकाराम खांडेकर यांनी सांगितले.

...

सार्वजनिक कार्यक्रम बंद

खजेवाडी हे अवघ्या दोनशे लोकसंख्येचे गाव आहे. येथील ग्रामस्थ सांगितलेल्या गोष्टीचे काटेकोर पालन करतात. वास्तविक पाहता हे गाव सांप्रदायिक आहे. तरीसुद्धा गेल्या दीड वर्षांपासून कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम अथवा भजन, कीर्तन, सप्ताह असे धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले नाहीत. युवक अमोल खजे व त्यांच्या मित्रांनी गावामध्ये जनजागृती केली. विशेष बाब म्हणजे ग्रामस्थ कुठल्याही सार्वजनिक ठिकाणांचा वापर करीत नाहीत. पाणी भरण्यासाठीसुद्धा सार्वजनिक हात पंपाचा वापर करत नाहीत. प्रत्येकाच्या घरी नळाद्वारे पाणी येते. स्वच्छता पाळली जाते, अशी माहिती उपसरपंच नीलेश पाटील यांनी दिली.

....

ग्रामस्थांचे कौतुक वाटते

कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. संसर्ग थांबविण्यासाठी नागरिकांनी स्वतः शिस्त पाळली पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि स्वच्छता ठेवावी. खजेवाडी आणि दगडवाडी येथील ग्रामस्थांचे खरोखर कौतुक वाटते.

- शरद झाडके, उपजिल्हाधिकारी.

...

दगडवाडी आणि खजेवाडीचा आदर्श इतरांनी घ्यावा.

ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोनाला दूर ठेवणे सहज शक्य आहे. प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतली पाहिजे. शासनाने घालून दिलेल्या नियम, अटी व शर्तीचे काटेकोर पालन करावे. दगडवाडी आणि खजेवाडी येथील ग्रामस्थांचा आदर्श इतर ग्रामस्थांनी घेऊन आपलेही गाव कोरोना मुक्त करावे.

-विपीन पाटील, तहसीलदार, अंबाजोगाई.

===Photopath===

020621\avinash mudegaonkar_img-20210529-wa0076_14.jpg

===Caption===

अंबाजोगाई तालुक्यातील दगडवाडी, खजेवाडी येथे नागरिकांच्या दक्षतेने दीड वर्षात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. दक्षता घेणारे नागरिक.