शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाकडून परजिल्ह्यातील मजुरांना काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्यावतीने सुरू असलेल्या वृक्षलागवड कार्यक्रमांमध्ये विविध ठिकाणी वनविभागाच्या जागेत असणाऱ्या रोपवाटिकेत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

धारूर : येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्यावतीने सुरू असलेल्या वृक्षलागवड कार्यक्रमांमध्ये विविध ठिकाणी वनविभागाच्या जागेत असणाऱ्या रोपवाटिकेत काम करण्यासाठी परजिल्ह्यातील व राज्याच्या विविध भागातील मजुरांना आणून या ठिकाणी काम केले जात असून स्थानिक मजुरांना मात्र डावलले जात आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बंडोबा सांवत यांनी केली आहे.

धारूर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत धारूर, केज वडवणी व माजलगाव तालुक्यांतील भाग येतो. या ठिकाणी वनपरिक्षेत्र कार्यालयाची मोठ्या प्रमाणात जमीन आहे. पावसाच्या कालावधीत वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या रोपवाटिकेत वृक्ष लागवड करून त्यांची जोपासना करण्यासाठी मजुरांना कामाची संधी मिळते. मात्र, धारूर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाने धारूर, कासारी, भायजळी, धुनकवाड, देवदहिफळ, अरणवाडी, कारी आदी ठिकाणच्या कामावर भूम, परांडा व विदर्भातील मजूर आणून त्यांना काम दिले आहे. मात्र, स्थानिक मजुरांना काम देण्यास टाळाटाळ केली जात आहे. स्वतःचे गैरव्यवहार झाकण्यासाठी फक्त वनपरिक्षेत्र या मजुरांचा वापर करीत असून या मजुरांना तत्काळ बंद करून स्थानिक मजुरांना या कामावर संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बंडोबा सावंत यांनी केली आहे. याबाबत वनपरीक्षेत्र अधिकारी यु. एच. चिटके यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.

260721\img-20210726-wa0043.jpg

परजिल्ह्ययातील येणारा मजूर