शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानप्रबोधिनीतर्फे व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सयंत्र प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:31 IST

अंबाजोगाई : आरोग्य यंत्रणा अधिक सुसज्ज व गतिमान करण्यासाठी ज्ञानप्रबोधिनीतर्फे लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरला दोन व्हेंटिलेटर व ...

अंबाजोगाई : आरोग्य यंत्रणा अधिक सुसज्ज व गतिमान करण्यासाठी ज्ञानप्रबोधिनीतर्फे लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरला दोन व्हेंटिलेटर व पाच ऑक्सिजन यंत्र अशी एकूण नऊ लक्ष रुपयांची मदत करण्यात आली. या यंत्रांचे रविवारी लोकार्पण करण्यात आले.

ज्ञानप्रबोधिनीतर्फे अतिशय चांगल्या दर्जाचे आणि उच्च गुणवत्तेचे फिलिप्स कंपनीचे दोन व्हेंटिलेटर व ५ ऑक्सिजन सयंत्र यांची मदत देण्यात आली. यासोबतच त्यासाठी लागणारे सयंत्रपण देण्यात आले. याकामी ज्ञानप्रबोधिनी फाउंडेशन अमेरिकेने यासाठी भरीव मदत केली आहे.

दरम्यान, ज्ञानप्रबोधिनीतर्फे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरला एकूण वीस लक्ष बाहत्तर हजार रुपयांची आरोग्य उपकरणे ज्ञानप्रबोधिनीतर्फे प्रदान करण्याचा संकल्प केला आहे. त्यापैकी नऊ लक्ष रुपयांच्या साहित्याची मदत रविवारी करण्यात आली. याच पद्धतीची अजून दहा लक्ष रुपयांची अशीच उपकरणे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात ज्ञानप्रबोधिनीच्या वतीने देण्यात येणार आहेत.

याप्रसंगी ज्ञानप्रबोधिनीचे संचालक प्रसाद चिक्षे, सदानंद वालेकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, उपजिल्हाधिकारी शरद झाडके, तहसीलदार विपीन पाटील, डॉ. संजय चव्हाण, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, महिला रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. अरुण केंद्रे, अधीक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण, रेणुका मातेकर, नेहा कुलकर्णी उपस्थित होते.

सामान्य कुटुंबातील रुग्णांना अत्याधुनिक व दर्जेदार रुग्णसेवा उपलब्ध व्हावी, रुग्णसेवेतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी ज्ञानप्रबोधिनीने पुढाकार घेतला आहे. रुग्णालयातील गैरसोयी लोकसहभागातून दूर करण्यासाठी सुरू असलेले हे काम रुग्णसेवेसाठी दिलासादायक आहे, असे गौरवोद्‌गार सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी काढले. यावेळी शरद झाडके, विपीन पाटील, अशोक साबळे, चंद्रकांत चव्हाण, डॉ. अरुणा केंद्रे यांची भाषणे झाली.

===Photopath===

230521\20210522_123055_14.jpg

===Caption===

ज्ञान प्रबोधिनीतर्फे लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरला दोन व्हेंटिलेटर व पाच ऑक्सिजन यंत्र सुपुर्द करताना पदाधिकारी.