बीड : गेवराई तालुक्यातील गोदापात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफियांविरोधात राक्षसभुवन येथे ५ फेब्रुवारी रोजी कारवाई केली. यावेळी त्यांच्याकडे असलेले दोन ट्रॅक्टर, एक दुचाकी व वाळू असा मिळून १२ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राक्षसभुवन येथे अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख सपोनि विलास हजारे हे त्यांच्या टीमसोबत शुक्रवारी सकाळी घटनास्थळावर पोहोचले़ त्यावेळी नदीपात्राताून वाळू उपसा होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी संबंधिताकडून वाहने व वाळू असा १२ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलिसांना पाहताच काहीजण वाहने सोडून त्या ठिकाणावरून पळून गेले. याप्रकरणी पोलीस अंमलदार बालाजी बास्टेवाड यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात ट्रॅक्टरमालक, चालक व दुचाकीचालक यांच्यावर चकलांबा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.