शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या विविध प्रश्‍नांची सोडवणूक समन्वयातून करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:44 IST

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील जनतेच्या विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी समन्वय समिती कटिबद्ध आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनानुसार शासन-प्रशासन आणि ...

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील जनतेच्या विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी समन्वय समिती कटिबद्ध आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनानुसार शासन-प्रशासन आणि सर्वसामान्य जनता यांच्या समन्वयातून समस्यांची उकल करून शासकीय योजना, मदतीपासून गोरगरीब, वंचित नागरिकांना न्याय देण्याच्या विधायक भूमिकेतून समन्वय व पुनर्विलोकन समिती काम करणार असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश्वर बाळासाहेब चव्हाण यांनी समितीच्या पहिल्याच बैठकीत केले.

शहरातील तहसील कार्यालयात तालुका समन्वय समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी राजेश्वर चव्हाण होते. बैठकीस सदस्य आ. संजय दौंड,माजी आ. पृथ्वीराज साठे, सदस्य सचिव तहसीलदार विपीन पाटील, अंबाजोगाई कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक गोविंद देशमुख, समितीचे सदस्य अर्जुन वाघमारे, औदुंबर मोरे, सखाराम टेकाळे, शीलाबाई सोमवंशी, सविता कोकरे तसेच संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष सुधाकर माले, पी. सी. पाटील, बाळासाहेब देशमुख, दत्तात्रय यादव, रवीकिरण देशमुख, अविनाश साठे, गुणवंत आगळे, सुधाकर जोगदंड यांचेसह या बैठकीस अंबाजोगाईचे नायब तहसीलदार, तहसील कार्यालयातील पदधिकाऱ्यांसह पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका कृषी अधिकारी, न. प. चे मुख्याधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी, उ.वि.अ.म.जि.प्रा.उपविभाग,विभागीय अभियंता सा.बां.विभाग,सहाय्यक निबंधक सहकारी संस्था,अभियंता ल.पा.उपविभाग जि.प.(बां) उपविभाग,उपविभागीय पाटबंधारे उपविभाग तसेच अंबाजोगाई तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांचे सर्व कार्यालय प्रमुखांची उपस्थिती होती.

या बैठकीत तालुका समन्वय समितीमार्फत तालुक्यातील विविध कार्यालयामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबतची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यात पंचायत समिती,तालुका आरोग्य विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग,गटशिक्षणाधिकारी,एकात्मिक बालविकास प्रकल्प ग्रामीण आणि शहर, कृषि विभाग, नगरपरिषद,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था,लघु पाटबंधारे उपविभाग,जि.प.(बां) उपविभाग,पाटबंधारे उपविभाग यांच्या माध्यमातून तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा बैठकीतील चर्चेत समावेश होता. समन्वय समितीचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या अध्यक्षीय मार्गदर्शनानंतर तालुका समन्वय समितीची बैठक संपली.

===Photopath===

140621\14bed_5_14062021_14.jpg