शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

उर्दूच्या बालवाडीताईंना सहा वर्षांपासून मानधनच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:29 IST

माजलगाव : अल्पसंख्याक समाजाला विशेष म्हणजे उर्दू भाषिक पाल्यांना राष्ट्रीय शैक्षणिक प्रवाहामध्ये सामावून घेण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न ...

माजलगाव : अल्पसंख्याक समाजाला विशेष म्हणजे उर्दू भाषिक पाल्यांना राष्ट्रीय शैक्षणिक प्रवाहामध्ये सामावून घेण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा नमुना समोर आला आहे.

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात असलेल्या ३३ उर्दू बालवाड्यांमध्ये काम करणाऱ्या ताईंना तब्बल सहा वर्षांपासून मानधनच देण्यात आले नसल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत सतत पाठपुरावा करूनदेखील प्राथमिक शिक्षण विभागाची उदासीनता दिसून येत असल्याने येत्या १ मार्च रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उर्दू ॲक्शन कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.

बीड जिल्हा परिषदेच्या वतीने २०१३ - १४ साली प्राथमिक शिक्षण विभागाकडून उर्दू प्राथमिक शाळांना संलग्न उर्दू बालवाड्या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये माजलगाव तालुक्यात ३३ उर्दू बालवाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. बालवाडीमध्ये शिक्षणाचे योगदान देणाऱ्या बालवाडीताईंना २०१३-१४मध्ये मानधन देण्यात आले. परंतु त्यानंतर सहा वर्षे उलटली तरी ही या बालवाडीताईंना मानधनच देण्यात आलेले नाही. याबाबत जिल्हा उर्दू कमिटीच्या वतीने संबंधित विभागाचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांना भेटून मानधन देण्याविषयी वारंवार लेखी व तोंडी विनंती केली. परंतु आजपर्यंत केवळ आश्‍वासनाशिवाय बालवाडीताईंच्या पदरात काही पडलेले नाही. त्यामुळे आता उर्दू बालवाडी सुरू राहण्याकरिता बालवाडीताई यांचे गेल्या सहा वर्षांपासूनचे मानधन जिल्हा परिषद, बीड शिक्षण विभागाने त्वरित देण्याचे आदेशित करावे, अन्यथा १ मार्चपासून माजलगाव गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपोषण व धरणे आंदोलनाचा इशारा उर्दू ॲक्‍शन कमिटीचे बीड जिल्हाध्यक्ष खतीब निसार अहमद व उपाध्यक्ष सय्यद खलील अहमद यांनी दिला आहे.