शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अनावश्यक बाबींची फी वसुली थांबवावी - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:38 IST

शिरूर कासार : आता सुरू असलेल्या सत्र ३, ५, ७ च्या नोंदणीवेळी काॅलेज प्रशासनाकडून उपभोग घेत नसलेल्या अनावश्यक बाबींची ...

शिरूर कासार : आता सुरू असलेल्या सत्र ३, ५, ७ च्या नोंदणीवेळी काॅलेज प्रशासनाकडून उपभोग घेत नसलेल्या अनावश्यक बाबींची फी वसुली केली जात असून ही वसुली थांबवावी व विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये, अशाप्रकारची मागणी कृषी पदवीधर संघटनेने कुलसचिव वसंतराव मराठवाडा कृषी विद्यापीठाकडे लेखी निवेदनाद्वारे मराठवाडा उपाध्यक्ष कृष्णा बडे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे . याबाबत निवेदनात कुलसचिवांचे लक्ष वेधले आहे. महाविद्यालय प्रशासन ग्रंथालय, जिम, वसतिगृह याबाबत फी वसुली करत आहे. वास्तविक महाविद्यालय बंद असल्याने कुठल्याही बाबींचा विद्यार्थ्यांनी उपभोग घेतला नाही शिवाय या महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले बहुतांश विद्यार्थी हे शेतकरीवर्गातील आहेत. कोरोना, लाॅकडाऊनमुळे सर्वच स्तरांवर मंदीचे सावट आहे. त्यातून शेतकरीसुद्धा सुटलेला नाही आणि अशा आर्थिक टंचाईत फी वसुली करणे आणि ती देखील अनावश्यक बाबींसाठी हे संयुक्तिक वाटत नाही, असे निवेदनात म्हटले आहे. याबाबींचा गांभीर्याने विचार करावा व फी वसुली थांबवावी, अशी आग्रही भूमिका संघटनेकडून केली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अमित माळी, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आवरगावे, सचिव तुषार भुतेकर तसेच उपाध्यक्ष कृष्णा बडे यांच्यासह सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.