बीड : महेश नवमीनिमित्त मोरया प्रतिष्ठान, युवा माहेश्वरी व महेश युवा मंच यांच्या वतीने सामूहिक वृक्षारोपणाचा सामाजिक उपक्रम शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी औषधी व बहुउपयोगी झाडे लावण्यात आली.
महेशनवमीनिमित्त दरवर्षी सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. याप्रसंगी कडूलिंब, वड, पिंपळ, रेन ट्री व सप्तपर्णी ही झाडे लावण्यात आली. सर्वप्रथम प्रदीप चितलांगे यांच्या हस्ते विप्रनगर भागात महेश चौकातील फलकाचे पूजन करून वृक्षारोपणाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी पत्रकार गंमत भंडारी, जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष प्रदीप चितलांगे, जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष सोहनी, प्रमोद मनियार, गिरीश सोहनी, भगीरथ चारखा, हनुमानदासमंत्री, विष्णुदास बियाणी, अशोक शेटे, नंदलाल मानधने, बसंताबाई साबू, रणछोडदास सारडा, रमेश कासट, नंदकिशोर जेथलिया, श्याम कासट, बद्रीनारायण मानधने, हरिनारायण सारडा, शिवनारायण कासट, संतोष चरखा, सुरेश कासट, जुगलकिशोर रांदड, देवीलाली चारखा, मुरली कासट, प्रेमसुख साबू, नगरसेवक अमर नाईकवाडे, मयूर कासट, नितीन मंत्री आदी मान्यवर उपस्थित होते. वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोरया प्रतिष्ठान, बीड जिल्हा युवा माहेश्वरी, महेश युवा मंचच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
===Photopath===
210621\21_2_bed_20_21062021_14.jpeg
===Caption===
महेश नवमिनित्त वृक्षारोपन करताना नगरसेवक अमर नाईकवाडे व इतर मान्यवर दिसत आहेत.