शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

तिसरी लाट; बालरोगतज्ज्ञांची फौज अन् ६६० खाटा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने दिलासा मिळत आहे. असे असले तरी तिसरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने दिलासा मिळत आहे. असे असले तरी तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यात लहान मुलांना अधिक धोका असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केल्यानंतर सर्व प्रशासन कामाला लागले आहे. बीडमध्येही आरोग्य विभागाने बीड जिल्हा रुग्णालयासह अंबाजोगाई स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय आणि इतर ठिकाणी स्वतंत्र वॉर्ड तयार केले आहेत. येथे बालरोगतज्ज्ञांची फौजही तयार ठेवल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयासह जवळपास ७० आरोग्य संस्था आहेत. पहिल्या लाटेचा सामना झाल्यानंतर दुसऱ्या लाटेत लोकांना खाटांअभावी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच लाटेत मृत्यूची संख्याही वाढली होती. आजही हे मृत्युसत्र कायम आहे. ते रोखण्यासाठी प्रयत्न सुरूच असल्याचा दावा आरोग्य विभाग करत असला तरी, अद्याप त्यांना यात यश आलेले नाही. दुसऱ्या लाटेचा सामना सुरू असतानाच तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यात ० ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना अधिक धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. हाच धागा पकडून राज्य व जिल्हा स्तरावर नियोजन केले जात आहे. बालरोगतज्ज्ञ, परिचारिका, वॉर्डबाॅय यांची नियुक्ती केली जात आहे. तसेच माता व बालकांना राहण्याची व जेवणाचीही सोय केली जाणार आहे.

दरम्यान, सोमवारी दुपारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांनी जिल्हा रुग्णालयातील स्वतंत्र वॉर्डची पाहणी केली. यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉ. सचिन आंधळकर, मेट्रन संगीता दिंडकर आदींची उपस्थिती होती.

प्रत्येक ठिकाणी ओपीडी आणि शरिक करून घेण्याची सोय

जिल्हा रुग्णालयात न्यू लेबर वॉर्डमध्ये ओपीडी असेल. येथे तपासणी करून रुग्णाला ॲडमिट केले जाणार आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र वॉर्ड तयार केले असून येथेही एक फिव्हर क्लिनिक असणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांनी आढावा घेतला आहे.

जिल्हा रुग्णालयात एकूण ५ वाॅर्ड तयार केले आहेत. येथे नवजात बालकांसाठी एक वॉर्ड असेल. त्यांच्या मातांची राहण्याची, जेवणाची पूर्ण सोय केली जाणार आहे. बाधित मुलांना आधार देण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारीही तैनात असणार आहेत.

जिल्ह्यात बीड जिल्हा रुग्णालयात १५० ऑक्सिजन खाटा आहेत. तसेच स्वाराती अंबाजोगाईत १५०, परळी व केजमध्ये प्रत्येकी ४०, आष्टी, गेवराई व पाटोदा येथे प्रत्येकी २० ऑक्सिजन खाटा तयार केल्या आहेत. यासह बीड व स्वाराती अंबाजोगाईत प्रत्येकी ५० खाटांचे आयसीयु केले आहे.

जिल्ह्यात ६६० ऑक्सिजन खाटा तयार केलेल्या आहेत. यात बीड व अंबाजोगाईत प्रत्येकी ५० खाटांचे आयसीयु असेल. तसेच ज्यांनी आतापर्यंत बाल विभागात काम केलेले आहे, अशा ४० नर्सेसनाही प्रशिक्षण देऊन योग्य मार्गदर्शन केलेले आहे. सरकारी डॉक्टर कमी पडल्यास खासगी लोकांची मदत घेतली जाईल.

- डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

===Photopath===

010621\01_2_bed_13_01062021_14.jpg~010621\01_2_bed_12_01062021_14.jpeg

===Caption===

डॉ.सूर्यकांत गित्ते~जिल्हा रूग्णालयात तयार केलेल्या स्वतंत्र वॉर्डची पाहणी करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते. सोबत बालराेग तज्ज्ञ डॉ.सचिन आंधळकर, मेट्रन संगिता दिंडकर आदी होते.