शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

स्वारातीचे सिटीस्कॅन चार दिवसांपासून बंद - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:33 IST

: सामान्य रुग्णांना मोठा आर्थिक फटका अंबाजोगाई : अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील सिटीस्कॅन गेल्या चार ...

: सामान्य रुग्णांना मोठा आर्थिक फटका

अंबाजोगाई : अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील सिटीस्कॅन गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात न्यूमोनिया आणि कोविड आजारांवर उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णांच्या सेवेवर विपरीत परिणाम होत आहे. शासकीय रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन बंद पडल्याने खासगी सिटीस्कॅनधारक प्रति रुग्ण ३ हजार ५००रुपये घेत असल्याने सामान्य रुग्णांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.

कोविड दुसऱ्या लाटेमध्ये बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुका हॉटस्पॉट बनत चालला असून कोविड आणि न्यूमोनिया सदृश आजार असणाऱ्या रुग्णांची संख्या येथील डीसीसीएच सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोविड, न्यूमोनियासह इतर आजारांचे योग्य निदान करण्यासाठी सिटीस्कॅनच्या निदानाचे खूप महत्त्व आहे. या व्यतिरिक्त रुग्णालयाच्या विविध आंतररुग्ण कक्षातील अत्यावश्यक रुग्णांचे सीटी स्कॅन करावे लागते. तसेच लोखंडी सावरगाव येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केलेल्या कोविड रुग्णांचे स्कॅनही स्वारातीच्याच मशीनवर करण्यात येतात. रुग्णालयात सतत वाढत जाणारा रुग्णांचा ताण या सिटीस्कॅन मशीनच्या सॉफ्टवेअरवर आल्यामुळे शनिवारी अचानक बिघाड झाला. त्यामुळे सिटीस्कॅन बंद झाले ते सोमवारपर्यंत सुरू झालेले नव्हते. रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन बंद पडल्याने खासगी सिटीस्कॅन सेंटरवर सामान्य रुग्णांना भुर्दंड सहन करावा लागत आहे.

मंगळवारी दुरुस्तीसाठी येणार अभियंता

या संदर्भात सिटीस्कॅन सेंटरवर उपलब्ध असलेल्या वैद्यकीय स्टाफशी चर्चा केली असता, त्यांनी सिटीस्कॅन मध्ये आलेल्या बिघाडास दुजोरा दिला असून सॉफ्टवेअर दुरुस्तीसाठी मंगळवारी कंपनीचे अभियंता येणार असून दुरुस्तीनंतर सीटी स्कॅन नियमित सुरू होईल असे सांगण्यात आले.