शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सराफा व्यापाऱ्याचा खून करणाऱ्यांना कठोर शासन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : येथील सराफा व्यापारी विशाल कुल्थे याचा निर्दयीपणे खून करणाऱ्या आरोपींना कठोर शासन व्हावे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरूर कासार : येथील सराफा व्यापारी विशाल कुल्थे याचा निर्दयीपणे खून करणाऱ्या आरोपींना कठोर शासन व्हावे, हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, अशी मागणी जिल्हा सुवर्णकार संघटनेने केली आहे.

दिनांक २० मेपासून गायब असलेला विशाल कुल्थे हा हरवला असल्याची फिर्याद कुटुंबीयांनी पोलिसांकडे २१ मे रोजी दिली होती. या फिर्यादीनुसार तपास सुरु असतानाच कुल्थे याला पळवून नेल्याचे समोर आले. त्यामुळे प्रथम हरवल्याचा व नंतर पळवून नेल्याचा आता उलगडा झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी कार्यवाही सुरू केली आहे.

या प्रकरणातील आरोपींनी अगदी निर्दयीपणे या तरूणाचा खून केला असल्याने त्यांना कठोर शासन करण्याची मागणी जिल्हा सुवर्णकार संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हाध्यक्ष सुधाकर बेदरे, नितीन टाक, रमण जोजारे, आदींनी उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्याशी चर्चा करून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे व उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी केली.

दरम्यान, बीड सराफ असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश लोळगे व सोनार समाजाचे अध्यक्ष विजय कुल्थे, मराठवाडा सराफ सुवर्णकार फेडरेशनचे उपाध्यक्ष सुधाकर दहिवाळ, महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे सल्लागार गणेश बागडे, अखिल भारतीय सराफ व सुवर्णकार युवा संघटनेचे कैलास मैड, हनुमंत डहाळे यांनी शिरूर कासार येथे जाऊन पोलीस अधिकाऱ्यांना भेटून या प्रकरणाची सखोल चौकशी व तपास करण्याची मागणी केली होती.

समाजसेवेचा बुरखा फाटला

या घटनेच्या आधी खून प्रकरणातील आरोपी ज्ञानेश्वर गायकवाड याने एका सामाजिक संघटनेचे पद मिळवले होते. त्या माध्यमातून त्याने आपण समाजसुधारक असल्याचा आव आणला होता. पोलिसांशी संबंध निर्माण व्हावेत, म्हणून पोलिसांना मास्क, सॅनिटायझर, आदीचे वाटप केले होते. मात्र, या खून प्रकरणाने त्याचा समाजसेवेचा बुरखा पुरता फाटला आहे.

===Photopath===

230521\vijaykumar gadekar_img-20210523-wa0061_14.jpg

===Caption===

सराफा व्यापारी विशाल कुल्थे याचा मृतदेह  भातुकवडगाव येथून आणल्यानंतर शिरूर कासार येथे अशी गर्दी झली होती.