शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील एसटी सेवा अद्याप ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबेजोगाई : कोरोना संसर्गाचे संकट गेल्या काही दिवसांत ओसरू लागले आहे. या पार्श्वभूमीवर कित्येक दिवसांपासून बंद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबेजोगाई : कोरोना संसर्गाचे संकट गेल्या काही दिवसांत ओसरू लागले आहे. या पार्श्वभूमीवर कित्येक दिवसांपासून बंद असलेला एसटीचा प्रवासही पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे. असे असले, तरी ग्रामीण भागात एसटी सेवा अद्याप ठप्प आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, अडचण दूर करण्याची मागणी जोर धरत आहे.

निर्बंधातून शिथिलता मिळाल्यानंतर, अंबेजोगाई आगाराची बस अंबेजोगाई ते पुणे, औरंगाबाद, अमरावती, लातूर, परळी, अहमदपूर यासह इतरही विविध जिल्ह्यांकडे धावू लागली आहे. मात्र, पाच महिन्यांनंतरही ग्रामीण भागाकडे एसटीची चाके वळलेली नाहीत. एसटी अद्याप बंद असल्याने, शेतकऱ्यांना तालुका, जिल्हास्तरावर ये-जा करण्यासाठी गैरसोय होत आहे, तसेच दिव्यांग व्यक्ती, वृद्ध नागरिक, आजारी रुग्ण, मजूर आदींना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असून, अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

...

नियमांचे पालन करू, एसटी सुरू करा

ग्रामीण भागातील एसटी सेवा पूर्ववत करण्यात यावी, आम्ही नियमाचे पालन करू, असा सूर अकोला, धारूर, मुडेगाव, बरदापूर, येलडा, राडी, धानोरा, वांगदरी, भावठाणा, आपेगाव, लिंबगाव यांसह इतरही अनेक गावांमधील प्रवाशांमधून उमटत आहे.

...

एसटी सेवा बंद असल्याने बाहेरगावी ये-जा करता येणे कठीण झाले आहे. यामुळे अनेक जण जीव धोक्यात घालून खासगी वाहनांनी प्रवास करीत आहेत. नागरिकांच्या खिशालाही यामुळे झळ बसत असून, ग्रामीण भागात एसटी सेवा पूर्ववत करावी.

- मधुसूदन कुलकर्णी, मुडेगाव.

....