शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव नगरपालिकेवर भगवा फडकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:22 IST

माजलगाव : येथील नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. ती ताब्यात घेण्यासाठी शिवसैनिकांनी एकत्र येऊन शहरातील वार्डावार्डांत ...

माजलगाव : येथील नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. ती ताब्यात घेण्यासाठी शिवसैनिकांनी एकत्र येऊन शहरातील वार्डावार्डांत जाऊन जनतेला शिवसेनेचे महत्त्व-कार्य सांगून, घर तिथे शिवसैनिक तयार करून पालिकेवर भगवा फडकवावा, असे शिवसेना नेते तथा गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले.

गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई रविवारी परभणी येथील कार्यक्रमास जात असताना त्यांनी माजलगाव येथे शनिवारी रात्री शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्या निवासस्थानी धावती भेट दिली. यावेळी देसाई यांचा जाधव कुटुंबीय, पदाधिकारी, शिवसैनिकांनी सत्कार केला. देसाई यांनी जिल्ह्यातील शिवसेना मजबूत करण्यासाठी जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव, पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांशी संघटन वाढीबरोबरच अनेक विषयांवर चर्चा केली.

कोरोना संकटाच्या काळात जिल्ह्यातील शिवसेनेने केलेल्या कार्याचे कौतुकही देसाई यांनी केले. जाधव कुटुंबीयांची व पदाधिकारी यांची विचारपूस केली.

याप्रसंगी कडाजीराव जाधव, उपजिल्हाप्रमुख रामराजे सोळंके, तुकाराम येवले, नगरसेवक अशोक आळणे, दासू बादाडे, अमोल डाके, अतुल उगले, कल्याण मोहिते, दिनेश मोहिते, सुखदेव धुमाळ, महादेव वैराळे, शुभम डाके, विठ्ठल जाधव, मुंजाबा जाधव, कदम आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती होती.