शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

वडवणीतील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:38 IST

वडवणी : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक, स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने येथील ...

वडवणी : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक, स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने येथील व्यापारी संकुलात 'लोकमत रक्ताचं नातं' मोहिमेंतर्गत १२ जुलै रोजी आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजकीय पदाधिकारी, मित्र परिवाराने या शिबिरात सहभाग नोंदवला. दिवसभर मान्यवरांनी या शिबिरास भेटी दिल्या व या उपक्रमाचे कौतुक केले.

स्वाराती शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीमार्फत हे रक्तदान करण्यात आले. या शिबिरास पोलीस, व्यावसायिक, शहरातील युवा तसेच ग्रामीण भागातील युवक उपस्थित होते. शिबिराचा शुभारंभ तालुका आरोग्य आधिकारी डाॅ. मधुकर घुबडे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख पाहुणे डाॅ. बाळासाहेब तांदळे, डीसीसी बँकचे संचालक आमोल आंधळे, तलाठी नारायण शिंदे, दत्ता वाकसे, युवराज शिंदे, सिध्देश्वर लंगे उपस्थित होते. कार्यक्रमाला शिवसेनेचे विनायक मुळे, पोलीस मनोज जोगदंड, रेवानत गंगावणे, व्यावसायिक सिध्देश्वर जिजा लंगे, व्यंकट देशमुख, किसनराव माने, ॲड. श्रीराम लंगे, सुभाष वाव्हळ, जानकिराम उजगरे, अध्यक्ष बाबुराव जेधे, जगदीश गोरे, अविनाश मुजमुले, वचिष्ठ शेंडगे, शंकर जाधव, अक्षय गोंडे, कारभारी लवटे, रविराज गोंडे, राहुल आबूज, सुशांत मस्के, सचिन मोरे, दिनेश नाईकवाडे, सचिन शेंडगे, उमेश शिंदे, धनराज शेंडगे, सुरेश मोटे, धनंजय जाधव, सतीश शिंदे, सलीम आबेद, आशोक गोंडे, स्वप्नील पुजदकर, रामहरी गोंडे, सतीश शिंदे, सत्यप्रेम नागरगोजे यांची उपस्थिती होती. यावेळी लोकमतचे तालुका प्रतिनिधी राम लंगे यांनी मान्यवरांचा सत्कार केला.

शिबिर यशस्वी करण्यासाठी भोलेनाथ लंगे, संदेश मस्के, किशोर अंडील, सखाराम मोरे, दत्ता वाकसे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळेस शासकीय रक्तपेढी अंबाजोगाईचे डॉ. सुजित तुमोड, शशिकांत पारखे, जगदीश रामदासी, शेख बाबा, शेख अनवर, इशरत अली तसेच लोकमत पार्टनर म्हणून श्री ओम स्टीलतर्फे प्रशांत वाघमारे, विशाल जाधवर, अत्तार सुबानी, ट्रीफ बिस्कीटचे ताहेर शेख उपस्थित होते.

लोकमतने रक्तदान महायज्ञ शिबिराचे आयोजन केल्याने गरजू रुग्णांचे प्राण वाचतील व मोठ्या प्रमाणावर रक्त उपलब्ध होण्यास मदत होईल. शिबिर आयोजन केल्याने लोकमतचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

- दत्ता वाकसे, धनगर समाज संघर्ष समिती

केजमध्ये उद्या रक्तदान शिबिर

केज : केज शहरात लोकमत व रोटरी क्लब ऑफ केज, शिवसेना, शिवसेना महिला आघाडी, संभाजी ब्रिगेड, शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने १४ जुलै रोजी केज शहरातील वकीलवाडी हनुमान मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात जास्तीत दात्यांनी रक्तदान करून रुग्णांचा जीव वाचवून एक सामाजिक आदर्श निर्माण करावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

या शिबिरात रक्तदान करण्यासाठी दीपक नाईकवाडे ९१३०१७७६६६, प्रा. हनुमंत भोसले ९४२३७३३८८८, पशुपतीनाथ दांगट ७७४४०१७९९९, रत्नाकर शिंदे ९४२१९१९१२२, रत्नमाला मुंडे ७०२०४६२७१४, सुमंत धस ९७६६०६१४०८, भाई मोहन गुंड ९४२३९७९४९२, सतीश राऊत ९४२३६१४०००, प्रवीण देशपांडे ९४२००३१५५५, राहुल खोडसे ९९२३८०२९६५, संदीप नाईकवाडे ९०७५९३४३४३, सतीश डांगे ८४५९५९५२११, कपिल मस्के ९४२२२४४०६७, बाबा मस्के ९७०२८८६४३७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

गेवराई येथे आज शिबिर

लोकमत परिवाराच्या वतीने शहरातील पत्रकार भवन येथे १३ जुलै रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदानासाठी लोकमत तालुका प्रतिनिधी सखाराम शिंदे ९०११५८०००५, गेवराई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर ९४०४२९१३८५, राष्ट्रवादी विद्यार्थी काँगेस तालुकाध्यक्ष अक्षय पवार ९६०४७८३९३९, दत्ता दाभाडे, जयसिंग माने, अमित वैद्य, मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे ९४२२३५३४४४, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शेख एजाज ९८२२८६११११, वंचित बहुजन आघाडीचे पप्पू गायकवाड ९८८१७६७४४४, आधार माणुसकी ग्रुपचे पोलीस रंजित पवार ९५२७३५२७४१, गजानन ग्रुपचे संभाजी सोसे, अनिल सोसे, अभिजित ठाकूर ९७६७८८८७९८, सराफ संघटनाचे राजेश टाक ९६०४००३३३३, सह शहरातील व तालुक्यातील विविध सामाजिक संघटना यांचे सहकार्य लाभणार आहे. रक्तदानासाठी वरील मोबाईल नंबरवर संपर्क करून रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

120721\12_2_bed_26_12072021_14.jpg

वडवणी कँप