शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धेश्वर शैक्षणिक संकुल हे गुणवत्ता, सामाजिक उपक्रमात कायम अग्रेसर : चंद्रकांत मुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:33 IST

श्री सिद्धेश्वर महाविद्यालय आणि आय.डी.एफ.सी. फर्स्ट भारत बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डिजिटल बोर्ड उद्‌घाटन आणि शिष्यवृत्ती ...

श्री सिद्धेश्वर महाविद्यालय आणि आय.डी.एफ.सी. फर्स्ट भारत बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डिजिटल बोर्ड उद्‌घाटन आणि शिष्यवृत्ती वितरण सोहळ्याप्रसंगी प्रमुख उदघाटक म्हणून ते बोलत होते.

या प्रसंगी व्यासपीठावर बँकेचे जनरल मॅनेजर (तामिळनाडू) जॉन पॉल अशोक, सहाय्यक मॅनेजर (महाराष्ट्र) शरद देडे, संकुलाचे अध्यक्ष प्रकाश दुगड, कार्यवाह अमरनाथ खुर्पे , महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभय कोकड ,केंद्रीय सदस्य तथा मुख्याध्यापक बाबूराव आडे, स्थानिक बँक मॅनेजर संदीप पवार, अमोल तुळसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी देवी सरस्वती आणि स्व.दत्तोपंतजी ठेंगडी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रा.अंकुश साबळे यांनी पद्य सादर केले.

महाविद्यालयातील स्नेहा गायकवाड, छाया चाटे, सुनीता ढगे या होतकरू विद्यार्थिनींना बँकेच्या वतीने शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. त्यानंतर उपप्राचार्य डॉ.गजानन होन्ना यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे जनरल मॅनेजर जॉन पॉल अशोक यांनी ३३ वर्षांपासून बँक करत असलेल्या सामाजिक उपक्रमानुसार आम्ही दिलेल्या डिजिटल बोर्डाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, हे सांगितले. याप्रसंगी शरद देडे आणि संदीप पवार यांचीही समयोचित भाषणे झाली.

अध्यक्षीय समारोपात प्रकाश दुगड म्हणाले की, आयडीएफसी बँक राबवत असलेले सामाजिक उपक्रम अतिशय उत्कृष्ट आहेत. शिक्षणासोबतच आज तरुणांना सामाजिक भान व मूल्य शिक्षण जपण्याचे धडे देणे आवश्यक झाले आहे असे त्यांनी म्हटले. प्रास्ताविक आणि परिचय गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख डॉ. विनायक देशमुख यांनी केले . तसेच सूत्रसंचालन डॉ. विकास बोरगावकर यांनी, आभार समीर मुळी यांनी मानले. या कार्यक्रमाचे संयोजन उपप्राचार्य युवराज मुळ्ये, डॉ.गजानन होन्ना ,संतोष लिंबकर आणि डॉ. विनायक देशमुख यांनी केले.

===Photopath===

160321\purusttam karva_img-20210316-wa0036_14.jpg

===Caption===

माजलगाव येथे श्री सिद्धेश्वर महाविद्यालय आणि आय.डी.एफ.सी. फर्स्ट भारत बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डिजिटल बोर्ड उद्‌घाटन आणि शिष्यवृत्ती वितरण सोहळ्याप्रसंगी प्रमुख उदघाटक म्हणून बोलताना प्रा.चंद्रकांत मुळे