शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आजारी सांगून सरकारीत रजा; खाजगी, ओपीडी मात्र जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:38 IST

आरोग्य विभागाला लावले ‘वेड’ : कंत्राटी मानसोपचारतज्ज्ञांचा कारनामा ‘लोकमत’ने आणला चव्हाट्यावर सोमनाथ खताळ/ स्टिंग ऑपरेशन बीड : प्रकल्प प्रेरणा ...

आरोग्य विभागाला लावले ‘वेड’ : कंत्राटी मानसोपचारतज्ज्ञांचा कारनामा ‘लोकमत’ने आणला चव्हाट्यावर

सोमनाथ खताळ/ स्टिंग ऑपरेशन

बीड : प्रकल्प प्रेरणा विभागात झालेल्या गैरप्रकारातील मुख्य सूत्रधार असलेल्या मानसोपचारतज्ज्ञाने चौकशीच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी आजारी असल्याचे कारण सांगत महिनाभर रजा टाकली. घरी आराम करण्याऐवजी या डॉक्टरने स्वत:ची खासगी ओपीडी जोरात सुरू ठेवली आहे. वेड्यांना शहाणे करणाऱ्या डॉक्टरने दिशाभूल करीत आरोग्य विभागालाच वेड्यात काढल्याचे समोर आले आहे. जिल्हा रुग्णालयातील कंत्राटी डॉक्टरचा हा सर्व कारनामा ''''लोकमत''''ने बुधवारी स्टिंग ऑपरेशन करून चव्हाट्यावर आणला आहे.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी स्थापन केलेल्या प्रकल्प प्रेरणा विभागात मानसोपचारतज्ज्ञ म्हणून डॉ. सुदाम मोगले यांची नियुक्ती केली. हजारो रुपये वेतन त्यांच्यावर खर्च करण्यात आले. समुपदेशन, उपचार आणि नियोजन असे कामही त्यांच्यावर सोपविले. परंतु, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना भेटीसह समुपदेशन कार्यक्रमासाठी त्यांनी तब्बल १२ लाख ६३ हजार रुपयांची उधळपट्टी केली. सर्व बिलांवर डॉ. माेगले यांच्याच स्वाक्षऱ्या आहेत. हा सर्व गैरप्रकार ''''लोकमत''''ने चव्हाट्यावर आणल्यावर आरोग्य संचालिका डॉ. साधना तायडे यांनी गंभीर दखल घेतली. उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांना चौकशीचे आदेश दिले. त्यांनी चौकशी केली असता पुन्हा चार कर्मचारी गैरहजर दिसले. यावर माहिती घेतली असता चौकशीच्या फेऱ्यातून वाचण्यासाठी डॉक्टरने आजारी असल्याचे कारण देत महिनाभर रजा टाकली. परंतु, त्यांनी आराम करण्याऐवजी आपली खाजगी ओपीडी जोरात सुरू ठेवल्याचे लोकमतने स्टिंग ऑपरेशन करून निदर्शनास आणले आहे. आरोग्य विभागाची कशाप्रकारे दिशाभूल केली, हे यातून दिसून येते. आता प्रकल्प प्रेरणा आणि खाजगी ओपीडी यामुळे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुदाम मोगले चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

---

आजारी असल्यावर आराम का नाही? आजारी असल्याने सरकारी ओपीडीत बसले नाहीत. मग, खाजगी ओपीडी काढायला येते का? आराम करायचा सोडून खाजगीत का बसले? जेवढ्या तळमळीने खाजगीत बसतात, तेवढेच सरकारीत का नाहीत बसत? असा सवाल उपस्थित होत आहे. केवळ भेटीच्या नावाखाली १२ लाखांची उधळपट्टी करून कागदोपत्री अहवाल तयार करण्याचा प्रकार केल्याचे सूत्रांनी सांगितले.

---

काही अर्जंट आलेले रुग्ण पाहत असतो. जे मागचे रुग्ण आहेत, त्यांना गोळ्या लिहून द्याव्या लागतात.

-डॉ. सुदाम मोगले, मानसोपचारतज्ज्ञ

--- डॉ. मोगले हे आजारी असल्याचे कारण देत एक महिन्याच्या सुटीवर आहेत. सुटीवर असल्याने आम्ही त्याकडे लक्ष देत नाहीत.

-डॉ. सुखदेव राठोड, अति. जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

---

आजारी असल्यावर आरामच करायला पाहिजे. असे असेल तर चूकच आहे. आजारी प्रमाणपत्रात संशय आल्यास मेडिकल बोर्डासमोर तपासले जाईल.

-डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

180821\264518_2_bed_37_18082021_14.jpeg

आजारी असल्याचे कारण देत सरकारीतून सुटी घेणारे डॉ.सुदाम मोगले स्वता:च्या घरी खाजगी ओपीडीत रूग्ण तपासत आहेत.