शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; वॉर्डबॉयच्या भरतीसाठी पैशांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:32 IST

बीड : जिल्हा रुग्णालयात कोरोनाकाळात भरती करण्यात आलेल्या वॉर्डबॉयच्या पदासाठी चक्क पैशांची मागणी केली जात असल्याचे समोर आले आहे. ...

बीड : जिल्हा रुग्णालयात कोरोनाकाळात भरती करण्यात आलेल्या वॉर्डबॉयच्या पदासाठी चक्क पैशांची मागणी केली जात असल्याचे समोर आले आहे. याबाबत एकाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गीते यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांना याचे कसलेही गांभीर्य जाणवले नाही. तर, दुसऱ्या बाजूला भरती प्रक्रियेत मुख्य असलेले एसीएस डॉ. सुखदेव राठोड आणि रुजू करून घेणारे मुकादम हे दोघेही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. संबंधित उमेदवार रविवारी बीड शहर पोलीस ठाण्यात अर्ज देण्यासाठी आला होता. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यात सध्या कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. यात मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने ३ महिन्यांचे कंत्राट देऊन परिचारिका, वॉर्डबॉयची भरती केली जात आहे. याच भरतीत अधिकारी, मुकादमांकडून पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. रविवारी मोमीन नामक वॉर्डबॉयला ऑर्डर दिली. यासाठी त्याने अगोदरच हात ओले केलेले असतानाही पुन्हा रुजू करून घेण्यासाठी बिभीषण गव्हाणे या मुकादमाने आणखी १ हजार रुपयांची मागणी केली. यावर संबंधिताने तत्काळ जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार केली. यावर त्यांनी लेखी देण्याचे सांगितले. परंतु, यापूर्वीदेखील अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सीएसकडून काहीच कारवाई न करता केवळ बघ्याची भूमिका घेतली जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांचेदेखील या भरती प्रक्रियेला अप्रत्यक्ष पाठबळ असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, पैसे मागितल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली असून चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.

गव्हाणे मुकादमाविरोधात तक्रारींचा ढिगारा

मुकादम गव्हाणे याच्याविरोधात काही दिवसांपूर्वीच एका नर्सने छेडछाड प्रकरणात तक्रार केली होती. मुकादम गव्हाणे हे दारू पिण्यासाठी पैसे घेऊन ड्युटी नसलेल्या वॉर्डबॉयला वॉर्डात पाठवत असल्याचा आरोप या नर्सने केला होता. परंतु, वरिष्ठांनी याकडे 'अर्थ'पूर्ण दुर्लक्ष करून मुकादमाला पाठीशी घातल्याचे दिसते.

होय, म्हणूनच वॉर्डबॉय काम करत नाहीत

जिल्हा रुग्णालयात वॉर्डबॉयच्या भरतीत आर्थिक उलाढाल झालेली आहे. प्रत्येक वॉर्डबॉयने भरती प्रक्रियेतील अधिकारी आणि मुकादमाला टक्केवारी दिल्याने ते वॉर्डमध्ये कसलेच काम करत नाहीत. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसते. याचा त्रास सामान्य रुग्णांना होत आहे. पैसे घेणारे मात्र, एसीच्या खोलीत बसून बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

....

वॉर्डबॉयला रुजू करून घेण्यासाठी पैसे मागितल्याबाबत कॉल आला होता. संबंधिताला लेखी तक्रार देण्यास सांगितले आहे.

-डॉ. सूर्यकांत गीते, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड