शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

सेवेतील त्रुटीबद्दल एसबीआयला ७ हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST

बँकेचे ग्राहक डाॅ. अनिल बारकूल यांनी २८ जून २०१६, २० सप्टेंबर २०१७ व ८ ऑक्टोबर २०१८ रोजी तीन ...

बँकेचे ग्राहक डाॅ. अनिल बारकूल यांनी २८ जून २०१६, २० सप्टेंबर २०१७ व ८ ऑक्टोबर २०१८ रोजी तीन धनादेश वटविण्यासाठी बीड येथील जालना रोडवरील एसबीआयच्या मुख्य शाखेत विहित मुदतीत जमा केले. यातील एक धनादेश मुंबईच्या येस बँकेचा, तर दोन धनादेश स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेचे होते. यातील नमूद रक्कम डॉ. बारकूल यांच्या खात्यात जमा झाली नाही. त्यामुळे डॉ. बारकूल यांनी वारंवार बँकेशी संपर्क केला. मात्र, त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. संबंधित बँकांना मुदतीत क्लिअरिंगला न गेल्याच्या कारणामुळे ते परत आल्याचे उत्तर मिळाले. मुदतीत दाखल केलेले धनादेश तत्काळ वटविण्यासाठी पाठवणे एसबीआय शाखेवर बंधनकारक होते. डॉ. बारकूल यांनी यासंदर्भात वकिलामार्फत नोटीस पाठवून धनादेशातील रक्कम व्याजासह मिळण्याची मागणी केली. तरीही समाधान न झाल्याने डॉ. बारकूल यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेतली. तिन्ही धनादेशांची रक्कम, तसेच शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापेटी नुकसानभरपाई, तसेच तक्रारीचा खर्च मिळावा म्हणून तक्रार दाखल केली.

या प्रकरणात सुनावणीदरम्यान बँकेने बाजू मांडून तक्रारदाराने आयोगापुढे केलेली मागणी मुदतबाह्य असल्याचे नमूद केले, तसेच इतरही युक्तिवाद करण्यात आला, तर येस बँकेने त्यांचा लेखी जबाब दाखल न केल्याने तक्रार त्यांच्या लेखी जबाबाशिवाय चालविण्यात आली, तर स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेने युक्तिवाद करत सेवेत कोणताही कसूर केला नसल्याची बाजू मांडली.

सुनावणी अंती ग्राहक तक्रार आयाेगाने तक्रारदार हे बँकेचे ग्राहक आहेत. बँकेने त्यांच्या सेवेत त्रुटी ठेवली. तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे तक्रारकर्ता अंशत: भरपाई मिळण्यास पात्र असल्याने तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत असल्याचे निर्णयात म्हटले आहे. त्यानुसार प्रतिवादी एसबीआयने तक्रारदार डॉ. बारकूल यांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासापोटी ५ हजार रुपये व तक्रारीचा खर्च २ हजार रुपये देण्याचे आदेश दिले.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष श्रीधर कि. कुलकर्णी, सदस्या अपर्णा दीक्षित, मेघा करूड यांनी हा निर्णय दिला.