शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

धारूर घाटात रस्ता उंचीचे काम सुरू; पर्यायी रस्ता नसल्याने वाहतूक दोन तास ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:28 IST

धारूर : धारूर-तेलगाव रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गावर अरणवाडी साठवण तलावात जाणाऱ्या रस्त्याची उंची वाढविण्याचे काम सुरू आहे. रस्त्यावरच खडी फोडून ...

धारूर : धारूर-तेलगाव रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गावर अरणवाडी साठवण तलावात जाणाऱ्या रस्त्याची उंची वाढविण्याचे काम सुरू आहे. रस्त्यावरच खडी फोडून काम सुरू असल्याने वाहनांना अडथळा होत असून, रविवारी रात्री दोन तास वाहतूक ठप्प होती, तर सोमवारी सकाळच्यावेळी पुन्हा वाहतूक ठप्प झाली होती.

एमएसआरडीच्या अधिकाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. प्रवासी वैतागून गेले असून, पर्यायी रस्ता करूनच रस्ता उंची वाढविण्याचे काम करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

धारुर शहरानजीक घाटाजवळ राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी खामगाव-पंढरपूर रस्त्यावर आरणवाडी साठवण तलावातील बुडित क्षेत्रात रस्त्याची उंची वाढविण्याचे काम चार महिन्यांपासून संथगतीने चालू असून, सध्या गुत्तेदाराने रस्त्यावर विहिरीचे खरपण टाकून फोडत असल्याने रस्ता अर्धा बंद असल्यामुळे रस्त्यावर तासन‌्तास वाहतूक बंद पडत आहे. वास्तविक तात्पुरता बाह्यवळण रस्ता करून काम करणे गरजेचे आहे. मात्र औरंगाबाद महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता जाधव यांचे याकडे पुर्णत: दुर्लक्ष असून, नागरिक त्रस्त झाले आहेत.

याप्रश्नी पाहणी करून संबंधितांना कडक सूचना देऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते सुधीर शिनगारे यांनी केली आहे. रविवारी रात्री या रस्त्यामुळे तब्बल दोन तास घाटात तेलगाव रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. सोमवारी सकाळच्यावेळी दीड ते दोन तास वाहतूक ठप्प होती. रोजच्या या त्रासाने वाहनधारक व प्रवासी बेजार झाले होते. तत्काळ पर्यायी रस्ता करावा व मगच या रस्त्याचे काम करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे