शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता झाला चांगला, जुनाट पूल बनले धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:21 IST

सखाराम शिंदे लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र ५२ पासून तीर्थक्षेत्र राक्षसभुवनकडे जाणारा रस्ता चांगला झाला ...

सखाराम शिंदे

लोकमत न्यूज नेटवर्क

गेवराई : तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र ५२ पासून तीर्थक्षेत्र राक्षसभुवनकडे जाणारा रस्ता चांगला झाला आहे; मात्र रस्त्यावरील जुने पूल वाहतुकीस धोकादायक ठरत आहेत. यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे.

गेवराई तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ पासून तीर्थक्षेत्र असलेल्या शनिच्या राक्षसभुवनकडे जाण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्यावरून जाताना जायकवाडी धरणाचा उजवा कालवा दोन, तीन ठिकाणी आडवा जातो. गोदावरीही जवळूनच वाहते. यामुळे छोट्या नद्या, नाल्यांना पावसाळ्यात पूर येतो. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद होते. या रस्त्यावर पूल आहेत. परंतु अरुंद आणि जुनाट झाले आहेत; तर काही मोडकळीस आलेले आहेत. या रस्त्याचे इतर काम झाले आहे. परंतु जुनाट पुलाचे काम झाले नाही. सध्या हे जुनाट पूल प्रवासासाठी धोकादायक बनले आहेत.

गंगावाडीजवळ असलेल्या अमृता नदीवर जुनाच पूल असल्याने थोडाही पाऊस झाला की पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे रस्ता बंद होतो. या रस्त्यावर अनेक गावे असल्याने व याच रस्त्यावरून गेवराईकडे यावे लागते. या रस्त्यावरील पुलांच्या दुरुस्तीची अनेकवेळा मागणी केली; परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे. तरी येथे राज्यभरातून येणा-या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी या रस्त्यावर नवीन पूल उभारावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

.....

नवीन पूल उभारण्याची मागणी

राक्षसभुवन फाटा-ते श्रीक्षेत्र राक्षसभुवन रस्त्यावरील पूल आता जुनाट झाले आहेत. ते कधी मोडतील, कोसळतील, याचा नेम नाही. हे पूल जुने झाले असल्याने अरुंद आहेत. यामुळे ते वाहतुकीस धोकादायक बनले आहेत. तरी या ठिकाणी आता नवीन पूल उभारावेत, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँगेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार, वंचित बहुजन आघाडीचे पप्पू गायकवाड यांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

.....

020721\20210702_125027_14.jpg~020721\20210702_124254_14.jpg