शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यासाठी बीडमध्ये लाल वादळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:34 IST

बीड : खरीप हंगाम २०२० मध्ये झालेल्या नुकसानीपोटी पीक विम्याची रक्कम मिळावी म्हणून बीड जिल्हा अखिल भारतीय किसान सभेच्या ...

बीड : खरीप हंगाम २०२० मध्ये झालेल्या नुकसानीपोटी पीक विम्याची रक्कम मिळावी म्हणून बीड जिल्हा अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

२०२० च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्व पीक नुकसानीचे शासनाच्या महसूल विभागाने पीक पंचनामे केलेले आहेत. शेतकऱ्यांना मदतही मिळाली. मात्र जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असताना महसूल विभागाने केलेले नुकसानीचे पंचनामे गृहीत धरून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा देण्यात यावा. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना जाचक ठरणाऱ्या अव्यवहार्य अटी शर्तींचा फेरविचार करून त्या वगळून ही योजना शेतकऱ्यांना झालेल्या पीक नुकसानाची भरपाई मिळण्यास सुलभ करावी. आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने ही निदर्शने करण्यात आली. यावेळी किसान सभेचे नेते कॉ. ॲड. अजय बुरांडे, कॉ. दत्ता डाके,कॉ. मुरलीधर नागरगोजे, कॉ. मोहन लांब आदीसह जिल्ह्यातील किसान सभेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------

पालकमंत्र्यांचे आश्वासन

आंदोलना दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. राज्य शासनाच्या वतीने

याबाबतीत लक्ष देऊन शेतकऱ्यांवर पीक विम्या संदर्भात अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.

---------

आंदोलनाने लक्ष वेधले

जिल्ह्याभरातून आलेले शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा झाल्यानंतर रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर शेतकऱ्यांच्या घोषणा व हातातील लाल झेंडे बीडकरांचे लक्ष वेधत होते.

300721\img_20210730_132243_14.jpg~300721\img_20210730_131327_14.jpg