शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:34 IST

बीड : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात आरोपी लव ऊर्फ राहुल चांदणे यास २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ...

बीड : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात आरोपी लव ऊर्फ राहुल चांदणे यास २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा येथील विशेष पोक्सो न्यायालयाचे न्या. एम. व्ही. मोराळे यांनी सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. मंजुषा एम. दराडे यांनी काम पाहिले.

प्रकरणाची हकीकत अशी की, बीड येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बीड येथेच राहणारा लव ऊर्फ राहुल चांदणे याने बलात्कार केला होता. त्यानंतर ही मुलगी गरोदर राहिली होती. तिने एका मुलास जन्मही दिला होता. या घटनेमुळे अल्पवयीन मुलीने पेठ बीड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. त्यावेळी आरोपी राहुल चांदणे याच्याविरुद्ध कलम ३७६ भादंवि व कलम ३,४, ५(जे) पोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. यानंतर पेठ बीड पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक आर. बी. बनकर यांनी प्रकरणाचा तपास करुन बीड येथील विशेष पोक्सो न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

हे प्रकरण बीड येथील विशेष पोक्सो न्यायालयाचे न्या. एम. व्ही. मोराळे यांच्या न्यायालयात चालले. सरकार पक्षातर्फे या प्रकरणात एकूण ४ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आलेल्या भक्कम पुराव्यांच्या आधारे तसेच विशेष सरकारी वकील अ‍ॅड. मंजुषा दराडे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी लव ऊर्फ राहुल चांदणे यास कलम ३७६ (२) व कलम ४ पोक्सो अंतर्गत दोषी धरून त्यास कलम ४ पोक्सो कायद्या अंतर्गत २० वर्षांची शिक्षा व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा तसेच कलम ५०६ (२) भादंविमध्ये सहा महिने शिक्षा व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे.

सदर प्रकरणी सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. मंजुषा एम. दराडे यांनी कामकाज पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी बिनवडे व महिला पोलीस शिपाई नागरगोजे यांनी सहकार्य केले.