शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जा सुरक्षा, शाश्‍वत विकास अन् पर्यावरण रक्षणासाठी केली जाणार जनजागृती - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:15 IST

यासंदर्भात माहिती देण्यासाठी इंडियन ऑईलचे विश्‍वजित कुमार, भारत पेट्रोलियमचे अमूल्य भुरिया, हिंदुस्तान पेट्रोलियमचे प्रसाद सावजी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद ...

यासंदर्भात माहिती देण्यासाठी इंडियन ऑईलचे विश्‍वजित कुमार, भारत पेट्रोलियमचे अमूल्य भुरिया, हिंदुस्तान पेट्रोलियमचे प्रसाद सावजी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. महोत्सवासंबंधी माहिती देताना ते म्हणाले, संरक्षण क्षमता महोत्सव हा एक महत्त्वाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. जो आपल्या देशाच्या ऊर्जासुरक्षा, शाश्‍वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी भारत सरकारने सुरू केला आहे. पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना, पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वयक यांनी पुढाकार घेऊन जनजागृती करण्यासंंबंधी राज्य सरकारच्या सक्रिय सहभागाने आणि पाठिंब्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

संपूर्ण देशभरात हरित आणि स्वच्छ ऊर्जा या घोषवाक्यांद्वारे १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत सक्षम (संरक्षण क्षमता महोत्सव)चे आयोजन करण्यात आलेले आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी इंधन संवर्धन, पेट्रोल पंप, गॅस एजन्सीज, तांत्रिक बैठक कार्यशाळेद्वारे संवर्धनावरील मोहीम, गृहिणींसाठी गटचर्चा, क्लब, संस्था, स्वयं‌सेवी संस्था, इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा, टी.व्ही., रेडिओवरील चर्चा कार्यक्रम आदी सुमारे २४ विविध उपक्रमांचे आयोजन जिल्ह्यात करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.