शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्रात गैरहजर राहून खासगी सेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 23:58 IST

सरकारी सेवेत असताना खासगी व्यवसाय करता येत नाही. मात्र, पाटोदा तालुक्यातील अंमळनेर आरोग्य केंद्रातील दोन्ही वैद्यकीय अधिकारी हे कायम गैरहजर राहून खाजगी सेवा करीत असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देवरिष्ठांचे दुर्लक्ष : सरकारी डॉक्टरांचे खाजगी दवाखाने असल्याने सामान्यांचे हाल

बीड : सरकारी सेवेत असताना खासगी व्यवसाय करता येत नाही. मात्र, पाटोदा तालुक्यातील अंमळनेर आरोग्य केंद्रातील दोन्ही वैद्यकीय अधिकारी हे कायम गैरहजर राहून खाजगी सेवा करीत असल्याचे समोर आले आहे. याचा फटका सामान्यांना बसत असून वरिष्ठांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणीही सरकारी डॉक्टरांचे खाजगी दवाखाने मोठ्या प्रमाणात असल्याचे सूत्रांनी सांगितले.अंमळनेर येथे करोडो रूपये खर्चून सुसज्ज अशी आरोग्य केंद्रासाठी इमारत उभारण्यात आली. येथे दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले. मात्र, हे दोन्ही डॉक्टर गायब रहात असल्याने सामान्य रूग्णांचे हाल होत असल्याच्या तक्रारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यांनी अचानक भेट दिल्यानंतर हे सत्य समोर आले. कायम गैरहजर राहण्याचे कारण शोधले असता येथील डॉ.राजेंद्र खरमाटे यांचे खरवंडी (ता. पाथर्डी जि. अहमदनगर) येथे, तर डॉ. परमेश्वर बडे यांचे शिरूर येथे खाजगी दवाखाना आहे. यामुळेच दोघेही केंद्रात गैरहजर रहात असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पाटोदा येथे डॉ.पवार यांनी आढावा बैठक बोलावली होती. येथे प्रसुतीबद्दल त्यांनी सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यांची कानउघडणी केली होती.अंमळनेर आरोग्य केंद्राच्या तक्रारीबद्दलही त्यांनी तात्काळ खुलासा करण्यास सांगितल्याचेही सूत्रांनी सांगितले होते. याबाबत डॉ.खरमाटे व डॉ.बडे या दोघांचीही बाजू समजून घेण्यात आली. त्या दोघांनीही खाजगी सरावाला दुजोरा दिला आहे.

टॅग्स :Beedबीडhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर