माजलगाव : भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या येथील सिद्धेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य हे द्वेषपूर्वक वागत असून, ते मानसिक छळ करतात या कारणावरून सोमवारी महाविद्यालयातील प्रयोगशाळा सहायक राजकुमार काळे यांनी महाविद्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
सिद्धेश्वर महाविद्यालयात प्रयोगशाळा सहायक म्हणून राजकुमार काळे हे काम करतात. त्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य भालचंद्र कराड यांच्या मनमानी कारभाराबाबत जिल्हाधिकारी तसेच इतरांना निवदेन दिले आहे. प्राचार्यांनी माझ्या पदाशी निगडित कार्यभार न देता कार्यालयीन कामकाजाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. माझे काम सांभाळून वेळच्यावेळी पूर्ण करीत असतो. बारावीच्या ५५० विद्यार्थांच्या आवेदनपत्राचे काम रात्रंदिवस बसून वेळेत पूर्ण कलेले आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये सर्वच्या सर्व किरकोळ रजा शिल्लक असताना माझी मुलगी आजारी असल्याचे कळाल्यावर मी रीतसर रजा मागणी करूनही माझी किरकोळ रजा मान्य केली नाही. पदाधिकाऱ्यास भेटण्यास प्रतिबंध केला. सहीसाठी हजेरीपट उपलब्ध करून दिला नाही. माझे माहे जानेवारी २०२१ पासून वेतनही अदा केले नाही. माझी सामाजिक, मानसिक, आर्थिक पिळवणूक केली जात असल्याने आपणास न्याय मिळावा, असेही काळे यांनी निवदेनात म्हटले आहे.
===Photopath===
240521\img_20210524_114227_14.jpg
===Caption===
सिध्देश्वर महाविद्यालयासमोर उपोषणास बबसलेले राजकुमार काळे