शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सीएसच्या तोंडाला काळं फासणारच्या अफवेने पोलिसांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:32 IST

बीड : जिल्हा शल्यचिकित्सकांच्या तोंडाला काळे फासणार, अशी माहिती बीड शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर दीपक थोरात या सामाजिक ...

बीड : जिल्हा शल्यचिकित्सकांच्या तोंडाला काळे फासणार, अशी माहिती बीड शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर दीपक थोरात या सामाजिक कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेत ठाण्यात बसविले. केवळ पोलिसांना पुढे करून सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना आणि जिल्हा छुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आणणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आरोग्य विभागाकडून अप्रत्यक्षरित्या केला जात असल्याचे दिसत आहे.

दीपक थोरात हे रविवारी दुपारी जिल्हा रुग्णालयात एका ओळखीच्या रुग्णाला भेटण्यासाठी आले होते. याच दरम्यान माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हेदेखील एका कार्यक्रमासाठी जिल्हा रुग्णालयात आले होते. त्यांच्यासमोर दीपक थोरात हे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गीते यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याची अफवा पसरवण्यात आली. त्यानंतर बीड शहर पोलिसांनी धाव घेत तात्काळ थोरात यांना ताब्यात घेत ठाण्यात आणून बसविले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ते ठाण्यातच होते.

दरम्यान, थोरात यांच्याकडून जिल्हा रूग्णालयातील गलथान कारभाराविरोधात नेहमीच आवाज उठविला जातो. काही दिवसांपूर्वीच रेमडेसिविर काळाबाजार आणि वॉर्डबॉय भरती प्रक्रियेत अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांनी पैसे घेतल्याचा आरोप करत तक्रार केली होती. त्यानंतर काही गुंडांकडून त्यांच्यावर हल्लाही झाला होता. हा हल्ला डॉ.राठोडनेच केला, असा आरोप करत थोरात यांनी त्यांच्या कक्षात जावून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. सात दिवस अतिदक्षता कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता पुन्हा त्यांच्यावर पोलिसांमार्फत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे. हा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचे थोरात म्हणाले.

....

दीपक थोरात हे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या तोंडाला काळे फासणार अशी गोपनीय माहिती मिळाली होती. त्यामुळे तत्काळ पथक पाठवून त्यांना ताब्यात घेण्यात आले. आता चौकशी सुरू असून योग्य ती कारवाई केली जाईल.

-रवी सानप, पोलीस निरीक्षक, बीड शहर.

...

मी ओळखीच्या रुग्णाला भेटायला आलो होतो. एवढ्यात पोलिसांनी मला ठाण्यात आणले. हे सर्व कटकारस्थान सीएस व एसीएस यांचेच आहे. आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. असे असले तरी या दोघांचे गैरकारभार समाजासमोर आणल्याशिवाय शांत राहणार नाही.

-दीपक थोरात, सामाजिक कार्यकर्ते.

....

मी पोलिसांना फोन केला नाही. मला याबाबत काहीच माहिती नाही.

-डॉ.सूर्यकांत गीते, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड.

===Photopath===

230521\23_2_bed_11_23052021_14.jpeg

===Caption===

दीपक थोरात यांना बीड शहर ठाण्यात आणण्यात आले होते.