शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

गावात पिण्याचे पाणी कायम मिळण्यासाठी आराखडा तयार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:35 IST

ऋषिकेश यशोद : जलजीवन मिशनअंतर्गत बुधवारपासून तालुका पातळीवर प्रशिक्षण प्रतिनिधी : ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पिण्याचे पाणी नळ ...

ऋषिकेश यशोद : जलजीवन मिशनअंतर्गत बुधवारपासून तालुका पातळीवर प्रशिक्षण

प्रतिनिधी : ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पिण्याचे पाणी नळ जोडणीद्वारे पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत ७ ऑगस्टपर्यंत गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान राबविण्यात येणार आहे. पिण्याचे पाणी कायमस्वरुपी नळाने मिळण्यासाठी गाव आराखडा तयार करावा. या विशेष अभियानात जिल्हा, तालुका व गाव पातळीवर सर्वांनी सहभाग घेऊन पंधरवडा अभियान यशस्वीरित्या राबविण्याचे आवाहन जलजीवन मिशनचे राज्य अभियान संचालक डॉ. ऋषिकेश यशोद यांनी पत्राद्वारे केले आहे. पिण्याचे पाणी सर्वांना नळाने मिळण्यासाठी जलजीवन मिशन राज्य पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, डाटा एंट्री ऑपरेटर तसेच जिल्हा कक्षाच्या सनियंत्रण मूल्यमापन सल्लागार यांना गाव कृती आराखड्याबाबत ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामध्ये गाव कृती आराखडा मधील माहितीचे संकलन ,राबविण्याच्या प्रक्रिया ,कोबो टूलद्वारे माहिती अपलोड बाबत हे प्रशिक्षण आहे.

गाव कृती आराखडा पंधरवड्यात जिल्हा कक्षातील तज्ज्ञ सल्लागार तालुका पातळीवरील गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत उपअभियंता, शाखा अभियंता गावपातळीवर ग्रामसेवक, जलसुरक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी सहभाग घेऊन गाव कृती आराखडा अभियान यशस्वीरित्या राबविण्याचे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी गिरी , ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रगुप्त सोनवणे यांनी केले आहे.

--------

आराखड्याची जबाबदारी गावांवरच

तालुका पातळीवर गटविकास अधिकारी २८ ते ३१ जुलै दरम्यान प्रशिक्षणाचे आयोजन करतील. यामध्ये गाव कृती आराखड्याबाबत सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पंप ऑपरेटर, आशा स्वयंसेविका, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे दोन प्रतिनिधींना प्रशिक्षण देतील. गाव कृती आराखडा निर्मितीची जबाबदारी ही गावांवरच देण्यात आली आहे.

-----

ग्रामसभेत मंजुरीसाठी विषय ठेवा

गाव पातळीवर १ ते ३ ऑगस्ट या कालावधीत गाव कृती आराखड्याच्या अनुषंगाने लागणारी माहिती कोबो टूल साधनांचा वापर करून संकलित करण्यात येईल तर ५ ते ७ ऑगस्टदरम्यान प्राप्त माहितीवरून गाव कृती आराखड्याची निर्मिती व गाव कृती आराखडा पडताळणी प्रक्रिया होणार आहे. १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये मंजुरीकरिता विषय कार्यक्रम पत्रिकेवर ठेवावा, असे डॉ. यशोद यांनी सूचित केले आहे.

-------------