शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या लाटेसाठी बालरोगतज्ज्ञांची ‘टास्क फोर्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:32 IST

बीड : पुढील सहा महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. या लाटेचा सर्वाधिक धोका बालकांना ...

बीड : पुढील सहा महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. या लाटेचा सर्वाधिक धोका बालकांना असल्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या आदेशानुसार बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स नियुक्त करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश २२ मे रोजी काढण्यात आले आहेत.

टास्क फोर्सचे अध्यक्ष अंबाजोगाईच्या बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. संभाजी चाटे तर सदस्य सचिव म्हणून जिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ (वर्ग १) डॉ. राम देशपांडे हे असतील. तसेच आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनुराग पांगरीकर हे समन्वयक असणार आहेत. सदस्यांमध्ये नेकनूरच्या कुटीर रुग्णालयाचे बालरोग तज्ज्ञ डॉ. सचिन आंधळकर, जिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. शंकर काशीद, स्वाराती रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. रमेश लोमटे यांचा समावेश असणार आहे. टास्क फोर्स बालकांमधील कोरोना कसा रोखावा ? कोरोनाग्रस्त बालकांच्या उपचार, त्याच्या पद्धतीबाबत आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मार्गदर्शन करणार आहे. या सर्व समितीमधील सदस्यांना बालकांच्या आरोग्यविषयक व कोरोनावर मात करण्यासाठी विविध उपाययोजनांचा अभ्यास करून त्यासंदर्भात मार्गदर्शन करणे बंधनकारक असणार आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आदेशात नमूद केले आहे.