शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

समाजकारणासाठीही पक्ष संघटन महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:21 IST

गेवराई : केवळ निवडणूक, राजकारणासाठी पक्ष संघटना मजबूत लागते, असे नाही, तर समाजकारण करतानासुद्धा पक्ष संघटनेची आवश्यकता भासते. कोरोनाच्या ...

गेवराई : केवळ निवडणूक, राजकारणासाठी पक्ष संघटना मजबूत लागते, असे नाही, तर समाजकारण करतानासुद्धा पक्ष संघटनेची आवश्यकता भासते. कोरोनाच्या कठीण संक्रमण काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. पक्ष संघटना मजबूत करताना स्वतःची काळजी घ्या, स्वतःसह इतरांचेही लसीकरण करून घेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले.

गेवराई विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांनी आढावा बैठक घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा मराठवाड्यात सुरू आहे. बीड जिल्ह्यातील यात्रेचा प्रस्तावित दौरा रद्द झाला असला तरीही विजयसिंह पंडित यांनी गेवराई विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध सेल व फ्रंटचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांशी आढावा बैठकीच्या माध्यमातून संवाद साधला.

यावेळी व्यासपीठावर भाऊसाहेब नाटकर, बाबूराव जाधव, जगन पाटील काळे, जगन्नाथ शिंदे, कुमार ढाकणे, फुलचंद बोरकर, जालिंदर पिसाळ, सुनील पाटील, अब्दुल हन्नान, मोनिका खरात, विलास सोनवणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात बैठक आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमात सुनील पाटील, फुलचंद बोरकर, गजानन काळे, भाऊसाहेब माखले, राजेंद्र बरकसे, अ‍ॅड. स्वप्नील येवले आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा युवकचे उपाध्यक्ष शेख सलीम यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्य अहवाल सादर केला. सूत्रसंचालन सुधीर गाडे यांनी केले. मोनिका खरात यांनी आभार मानले.

010721\291701bed_6_01072021_14.jpg