शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन पडला बंद; परिचारिका म्हणाली... ही माझी जबाबदारी नव्हे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 19:18 IST

वडवणी तालुक्यातील एक २९ वर्षीय तरुण कोरोनाबाधित असल्याने वॉर्ड क्रमांक ६ मध्ये उपचार घेत आहे.

ठळक मुद्दे नातेवाईकांच्या तक्रारीनंतर सीईओ, सीएस, एसीएस धावले

बीड : कोरोनाबाधित रुग्णाचा ऑक्सिजन अचानक बंद पडला. याबाबत नातेवाईकांनी विनंती केल्यानंतरही परिचारिकेने, हे आपले काम नाही, असे सांगत हात झटकले व या गंभीर प्रकाराची दखल घेतली नाही. त्यानंतर हवालदिल नातेवाईकांनी याबाबत तक्रार केली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. हा प्रकार वॉर्ड क्रमांक ६ मध्ये गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडला. आता या वॉर्डमधील दोन नर्सवर कारवाईची टांगती तलवार आहे.

वडवणी तालुक्यातील एक २९ वर्षीय तरुण कोरोनाबाधित असल्याने वॉर्ड क्रमांक ६ मध्ये उपचार घेत आहे. दोन दिवसांपासून तो ऑक्सिजनवर आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ऑक्सिजन पुरवठा बंद पडला, त्यामुळे रुग्णाला त्रास सुरू झाला. त्याने हा प्रकार तात्काळ मोबाईलवरून नातेवाईकांना सांगितला. नातेवाईकांनी धाव घेतली व येथील सोनाली पवार या परिचारिकेकडे ऑक्सिजन लावण्याची विनंती केली. यावर त्यांनी, हे काम वॉर्डबॉयचे आहे, असे सांगून दुर्लक्ष केले. यावर याच वॉर्डमधील दुसरी परिचारिका दीपांजली काळे यांनीही, नातेवाईक म्हणतच असतात, आपण दुर्लक्ष करायचे, असे सांगत ऑक्सिजन लावण्यास टाळाटाळ केली. हा सर्व प्रकार मेट्रन संगीता दिंडकर यांना कळवताच परिचारिकांनी तात्काळ ऑक्सिजन लावला.दरम्यान, रुग्णाच्या नातेवाईकांनी या गंभीर प्रकाराबद्दल जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांना माहिती दिली. कुंभार यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, डॉ. सुखदेव राठोड यांनी वॉर्डात धाव घेतली. नातेवाईक व परिचारिका यांना समोरासमोर उभे करताच सर्व चुका निदर्शनास आल्या. यावर डॉ. गित्ते यांनी या दोन्ही कंत्राटी परिचारिकांना टर्मिनेट करण्याच्या सूचना डॉ. राठोड यांना दिल्या. परंतु, शुक्रवारी उशिरापर्यंत याबाबत आदेश निघाले नव्हते.

नातेवाईक बाहेर, आतमध्ये अनागोंदी कारभारसंसर्ग वाढत असल्याचे कारण सांगत प्रशासनाने नातेवाईकांना वॉर्डमध्ये जाण्यास बंदी घातली. परंतु, आतमध्ये परिचारिका, डॉक्टर रुग्णांकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे डॉक्टर, परिचारिकांवर विश्वास नसल्यानेच नातेवाईक आत जाण्याचा हट्ट धरत असल्याचे दिसते. आरोग्य विभाग स्वत:च्या अनागोंदी कारभारावर पांघरूण घालण्यासाठी पोलिसांना पुढे करत असल्याचे दिसते.

वॉर्ड क्रमांक ६ मधील दोन्ही परिचारिकांना टर्मिनेट करण्याच्या सूचना केल्या आहेत. याचे आदेश निघतील.- डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीड