शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

५० हजारांची लाच स्वीकारताना कनिष्ठ लिपिकासह एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST

बीड : आरओ प्लांटचे वाढीव वीजबील कमी करण्यासाठी तक्रारदाराने महावितरण, परळी येथील कार्यालयात अर्ज केला होता. दरम्यान, ते कमी ...

बीड : आरओ प्लांटचे वाढीव वीजबील कमी करण्यासाठी तक्रारदाराने महावितरण, परळी येथील कार्यालयात अर्ज केला होता. दरम्यान, ते कमी करण्यासाठी ५० हजारांची लाच कनिष्ठ लिपिकाने मागितली होती. यापैकी ३० हजारांची लाच स्वीकारताना कनिष्ठ लिपिक व एका खासगी व्यक्तीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने गुरुवारी केली.

तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावाने असलेल्या आर. ओ. प्लांटचे फेब्रुवारी २०२१ मध्ये व्यावसायिक मीटरचे ३ लाख ५५ हजार ७५० रुपये रुपये बिल आलेले होते. परंतु बिलामधील रिडिंग आणि मीटरमधील रिडिंग यात तफावत येत असल्याने तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाने परळी येथील महावितरण कार्यालयात बिल दुरुस्त करून देण्यासाठी अर्ज दाखल केला होता. बिल दुरुस्तीनंतर तक्रारदार यांनी ९४ हजार रुपये बिल परळी येथील महावितरण कार्यालयात भरले होते, परंतु, एक लाखापुढील बिल दुरुस्तीचे अधिकार महावितरणचे विभागीय कार्यालय, अंबाजोगाई यांना असल्याने तक्रारदार यांनी पत्नीच्या नावाने बिल दुरुस्तीबाबत विभागीय कार्यालयात अर्ज केला. हा बिल दुरुस्ती प्रस्ताव वरिष्ठांकडून मंजूर करून घेण्यासाठी आरोपी सचिन निशिकांत सूर्यवंशी (कनिष्ठ लिपिक महावितरण कार्यालय, परळी ) याने तक्रारदारास ५० हजारांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ३० हजारांची लाच गुरुवारी व उर्वरित २० हजार रुपयांची लाचेची रक्कम काम झाल्यानंतर स्वीकारण्याचे मान्य करून ३० हजार रुपये लाच खासगी व्यक्ती शेख सगीर फकीर महम्मद (रा. हबीबपुरा, परळी) याच्यामार्फत पंचांसमक्ष स्वीकारताना त्याच्यावर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक मारुती पंडित, उस्मानाबाद पोलीस प्रशांत संपते, बाळकृष्ण हनपुडे- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबादचे पोलीस निरीक्षक अशोक हुलगे पोलीस अंमलदार, इफ्तेकर शेख, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, चालक दत्तात्रय करडे यांनी केली.

नागरिकांनी करावी तक्रार

कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खासगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल, तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन उस्मानाबाद उपाधीक्षक प्रशांत संपते यांनी केले आहे.