शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांच्या झटापटीत वृद्धाचा मृत्यू ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:32 IST

बीड : तालुक्यतील वैद्यकिन्ही येथे चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांसोबत झालेल्या झटापटीत एका ६५ वर्षीय वृद्दाचा मृत्यू झाल्याचा संशय ...

बीड : तालुक्यतील वैद्यकिन्ही येथे चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांसोबत झालेल्या झटापटीत एका ६५ वर्षीय वृद्दाचा मृत्यू झाल्याचा संशय घरच्या मंडळींनी व्यक्त केला आहे. ही घटना रविवारी पहाटे २.१५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यावेळी चोरट्यांनी परिसरातील घरांना बाहेरून कड्या लावल्या होत्या. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विष्णू बाबूराव जाधव (वय ६५) असे झटापटीत मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. दरम्यान, पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही येथे अज्ञात चोरटे चोरीच्या उद्देशाने आले होते. यावेळी उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे विष्णू जाधव यांचे कुटुंब घराच्या बाहेर झोपले होते. दरम्यान, चोरटे त्याठिकाणी चोरी करण्यासाठी आले असता, महिलेच्या हातावर काठी मारण्यात आली. यावेळी महिलेने चोरट्याचा पाठलाग केला. मात्र, तो पळून जाण्यात यशस्वी झाला. यावेळी परत येऊन पाहिल्यानंतर विष्णू जाधव हे काहीच बोलले नाहीत. त्यामुळे त्यांना पाटाेदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, शवविच्छेदन केले असता त्यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा डॉक्टरांनी अहवाल दिला आहे. मात्र, चोरट्यांच्या झटापटीत मृत्यू झाल्याचे नातेवाइकांनी सांगितले. त्यामुळे काही काळ रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पाटोदा पोलीस व उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांच्या शोधासाठी पथकांची नेमणूक देखील करण्यात आली आहे, तर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. तपासाला गती देण्यात आली असून, लवकरच धागेदोरे लागतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि वैशाली पेटकर करीत आहेत.

घटनास्थळी भेट

घटना घडल्याची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक विजय लगारे व पाटोदा पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, बोटांचे ठसे घेतले असून, घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. तपासासाठी पथकदेखील नेमण्यात आले आहे. श्वानपथकाकडे श्वान नसल्यामुळे त्यांना पाचारण करता आले नाही.

------

घटना घडल्यानंतर काही वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. दरम्यान, नागरिक सांगत असेलेले मृत्यूचे कारण व शवविच्छेदन अहवाल यात साम्य नसल्यामुळे वृद्धाचा मृत्यू नेमका कसा झाला हे स्पष्ट नाही. मात्र, तपासात सर्व निष्पन्न होईल

विजय लगारे, पोलीस उपअधीक्षक, आष्टी विभाग

-----------------------