शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातून मिळेना बसला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:35 IST

पुरुषोत्तम करवा माजलगाव : मागील तीन आठवड्यांपासून येथील आगाराने ग्रामीण भागात अनेक गावांत बस सुरू केली होती. अनेक सुविधा ...

पुरुषोत्तम करवा

माजलगाव : मागील तीन आठवड्यांपासून येथील आगाराने ग्रामीण भागात अनेक गावांत बस सुरू केली होती. अनेक सुविधा असताना प्रवासी बसला पाठ दाखवत असल्याने आगाराचे नुकसान होत असून, काही गावात बस सोडायची की नाही, असा प्रश्न आगारप्रमुखांना पडला आहे.

माजलगाव आगारातून १५-१६ महिन्यांपासून बस अनेकवेळा चालू बंद करण्यात आल्या. शहरी भागात जाणाऱ्या बसला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद पाहता बस वाढवण्याची वेळ येथील आगारावर आली, तर २०-२२ दिवसांपासून येथील आगारातून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बससेवा सुरू केली होती. सुरुवातीला दोन फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. सध्या तालुक्यातील खतगव्हाण, गुंजथडी, डुब्बाथडी, गोवर्धन, पुंगणी, आनंदगाव, मंजरथ, आबेगाव, पुरुषोत्तमपुरी आदी गावांना बससेवा सुरू करण्यात आली आहे.

गुंजथडी, आबेगाव, पुरुषोत्तमपुरी, गोवर्धन या गावात जात असलेल्या बसला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने फेऱ्या वाढवण्यात आल्या असून, सध्या या गावांना दिवसातून तीन वेळा बस सोडण्यात येत आहेत. प्रवासी वाढल्यास त्या गावांना जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत, तर बाकीच्या गावांना प्रवाशांकडून बसला पाठ दाखवण्यात येत आहे. या गावात बसमध्ये २०-२५ टक्केच प्रवासी प्रवास करताना दिसून येत आहेत. सध्या मोहखेडमार्गे अंबाजोगाई ही नवीन बससेवा सुरू करण्यात आली असल्याचे या आगाराकडून सांगण्यात येत आहे.

बसमधून प्रवासाची भीती जाईना

ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये कोरोनाच्या बाबतचे भीतीचे वातावरण अद्याप कमी झालेले दिसत नाही. विशेष म्हणजे वयोवृद्ध नागरिकांमध्ये याची भीती जास्त असल्याने वयोवृद्ध नागरिक बसमधून प्रवास करण्यात टाळाटाळ करताना दिसत आहेत. ते मोटारसायकल किंवा अवैध वाहनांना प्राधान्य देताना दिसत आहेत.

------

बसमधून अंध, अपंग, वयोवृद्ध नागरिकांना सुविधा मिळत असतानादेखील ग्रामीण भागातील हे नागरिक बसने प्रवास करण्यास टाळाटाळ करताना दिसत आहेत. सध्या ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात प्रवास करणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढत आहे. यामुळे चालणाऱ्या गाड्यात फायदा होत असून, ग्रामीण भागातील बस तोट्यात चालल्या आहेत.

-दत्तात्रय काळम पाटील, आगारप्रमुख, माजलगाव

---