शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक सिलिंडरची दरवाढ झाल्याने हॉटेल्सचालकांसमोर नवीन संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:35 IST

भाववाढ करावी, तर ग्राहक येईना अंबाजोगाई : कोरोना काळात दीड वर्षांत हॉटेल्स व चहाच्या टपऱ्या जवळपास आठ महिने ...

भाववाढ करावी, तर ग्राहक येईना

अंबाजोगाई : कोरोना काळात दीड वर्षांत हॉटेल्स व चहाच्या टपऱ्या जवळपास आठ महिने बंद राहिल्याने आणि कच्चा माल व व्यावसायिक सिलिंडरचे दर तब्बल ४३० रुपयांनी वाढल्याने हॉटेल्सचा व्यवसाय करणाऱ्यांची मोठी चिंता वाढली आहे.

गेल्यावर्षीपासून या व्यवसायाची बिघडलेली स्थिती अजूनही सुधारलेली नाही. यावर्षीही मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने बहुतांश दिवस हॉटेल्स व्यवसाय बंद राहिले, तर आता वेळेच्या मर्यादेमुळे ग्राहकांची संख्या घटली आहे. लोक हॉटेल्स आणि स्वीटहोममधील पदार्थांची खरेदी करणे टाळत आहेत. याशिवाय माल तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने हॉटेल व्यवसाय केवळ नावापुरतेच चालवावे लागत आहेत. आता नाश्ता आणि हॉटेलमध्ये जेवण महाग झाले आहे. त्यातच हॉटेलचालकांना लागणाऱ्या व्यावसायिक १९ किलोच्या सिलिंडरची वर्षभरात ४३० रुपयांनी वाढ झाली आहे. महागाई वाढल्याने कर्मचारी पगारवाढीची मागणी करीत आहेत. याशिवाय विजेचे दर, विविध कर, पाण्यावर होत असलेला खर्च आदींची वाढ झाली आहे. ना नफा ना तोटा या तत्त्वावर हॉटेल व्यवसाय सुरू आहे. कधी कधी पदार्थ उरल्यास तोटाही सहन करावा लागतो. सध्या सण नसल्याने मिठाईला मागणी कमीच आहे. या सर्व कारणांमुळे हा व्यवसाय चालवावा की नाही? ही गंभीर समस्या भेडसावू लागली आहे.

भाववाढ केली, तर ग्राहक येईना

भाज्या, खाद्यतेल आणि डिझेल वाढल्याने सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. अशा महागाईत मालाच्या किमती वाढविणे हाच एक पर्याय आहे. मात्र भाववाढ केल्यास ग्राहक येणार नाहीत, अशी स्थिती होऊ नये. त्यामुळे पदार्थांच्या किमती वाढवता येत नाहीत.

पार्सल विक्रीही थंडावली

हॉटेल व्यवसाय दुपारी ४ वाजता बंद झाल्यानंतर पार्सल विक्रीसाठी मुभा दिली गेली असली, तरीही एकदा बाजारपेठ बंद झाल्यानंतर ग्राहकही पार्सलच्या मागणीसाठी फिरकत नाहीत. अनेकांची इच्छा हॉटेलमध्ये बसून खाण्याचीच असते. याचाही मोठा फटका या व्यवसायाला कारणीभूत ठरू लागला आहे.