शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयकृत बँकांकडून नियमांचे उल्लंघन !

By admin | Updated: October 5, 2014 23:57 IST

पाटोदा: शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्याच्या योजनेला राष्ट्रीयकृत बँका हरताळ फासत आहेत. शेतकऱ्यांकडून व्याजासह प्रोसेस , व्हिजिट अशा वेगवेगळ्या नावांनी बँका वसुली करत आहेत.

पाटोदा: शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्याच्या योजनेला राष्ट्रीयकृत बँका हरताळ फासत आहेत. शेतकऱ्यांकडून व्याजासह प्रोसेस , व्हिजिट अशा वेगवेगळ्या नावांनी बँका वसुली करत आहेत. अग्रणी बँकेसह रिझर्व बँकेच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रारी होऊनही शेतकऱ्यांची लूट अद्यापही चालूच आहे.राज्यात १९९१ पासून शेतकऱ्यांना बिनव्याजी पीक कर्ज देण्याची योजना सरकारने चालू केली. सुरूवातीला कर्ज रक्कम अल्प होती. २०१० पासून या योजनेअंतर्गत १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी देण्याचे आदेश आहेत. पीक कर्जास व्याज आकारू नये. शिवाय इतर कर्जाप्रमाणे कुठल्याही फिसची आकारणी करू नये, असे सहकार आयुक्तांचे स्पष्ट आदेश आहेत.पाटोदा येथील जिल्हा बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, स्टेट बँक आॅफ हैदराबाद आणि स्टेट बँक आॅफ इंडिया या चार बँकांमधून कर्ज वाटप केले जाते. पैकी जिल्हा बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँकपीक कर्जावर व्याजांची आकारणी करतात. शेतकऱ्यांकडून मुद्दल वसुली करतात आणि डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदान रक्कम आल्यानंतर व्याज जमा करतात. स्टेट बँक आॅफ हैदराबाद आणि स्टेट बँक आॅफ इंडिया या बँका शेतकऱ्यांकडून प्रथमवर्षी सुमारे ७ टक्के व्याज प्रोसेसिंग, व्हिजीटींग आदी चार्जच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून अव्वाच्यासव्वा रकमा वसूल करून घेतात. कर्ज देण्यातही आखडता हातशेतकऱ्यांना पीक कर्ज देताना कामाच्या व्यवस्थापनासाठी बँकांकडे विशिष्ट गावे दिली आहेत. बँकांनी त्यांच्याकडे दिलेल्या गावांना कर्ज पुरवठा करावाच मात्र इतर शेतकऱ्यांना कर्ज देऊ नये असा कुठेही स्पष्ट आदेश अथवा नियम नाही. असे असताना ‘ते गाव आमच्या बँकेकडे नाही’ अशा सबबीखाली कर्ज देण्याचे टाळले जात असल्याचा आरोप ग्राहकांमधून केला जात आहे. याबाबत सहायक उपनिबंधक एस.व्ही. बोराडे म्हणाले, बँका व्याज वसुली करीत असतील तर गंभीर बाब आहे. असे असेल तर त्यांच्यावर थेट कारवाईचा बडगा उभारू. जाधव यांचा संतप्त प्रतिक्रियाविष्णू जाधव यांनी काही महिन्यांपूर्वी ९८ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. वर्ष पूर्ण न होताच त्यांच्याकडून १ लाख ७ हजार ४५० रुपयेभरणा आकारण्यात आला आहे. त्यामुळे जाधव यांनी बँकेच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया विष्णू जाधव यांनी बोलताना केली. लुट थांबविण्याची मागणी आहे. (वार्ताहर)