शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

निधी पळविण्याचे मनसुबे उधळले !

By admin | Updated: August 17, 2014 00:13 IST

संजय तिपाले , बीड दलित वस्ती विकासासाठी आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या पळवापळवीला ‘कोल्हे पॅटर्न’ने यंदा चांगलाच दणका दिला आहे. निधीसाठी दरवर्षी होणारी रस्सीखेच यावेळी नाही.

संजय तिपाले , बीडदलित वस्ती विकासासाठी आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या पळवापळवीला ‘कोल्हे पॅटर्न’ने यंदा चांगलाच दणका दिला आहे. निधीसाठी दरवर्षी होणारी रस्सीखेच यावेळी नाही. त्यामुळे दलित वस्त्यांतील विकासाचा ‘बॅकलाग’ तर भरुन निघेलच शिवाय अनावश्यक खर्चालाही ‘ब्रेक’ लागणार आहे. समाजकल्याणकडून १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून दायित्वाचे ७ कोटी वजा जाता १३ कोटी रुपये खर्चासाठी शिल्लक राहतात. समाजकल्याण विभागाकडून दलित वस्त्यांमध्ये वीज, नाल्या, रस्ता, समाजमंदिर, पाणवठे आदी कामे करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो़ जिल्हा नियोजन समितीकडून हा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात येतो़ गतवर्षी १३ कोटी रुपये आले होते़ मात्र निधी वाटपावरुन चांगलेच राजकारण रंगले होते़ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ अशोक कोल्हे हे रजेवर गेल्यानंतर निधी वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली़ मात्र या निधी वाटपात विशिष्ट भागाचा प्रभाव राहिल्याच्या तक्रारी झाल्या़ दोन वर्षापूर्वी डॉ़ कोल्हे यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता़ तेव्हा त्यांनी ग्रामपंचायतींमधील अनुसूचित जाती जमातीच्या लोकसंख्येच्या अनुषंगाने निधी वाटपाची आॅनलाईन प्रक्रिया राबविली होती़ त्यामुळे दलित वस्ती विकासासाठीच्या निधीपासून वंचित राहिलेल्या गावांना न्याय मिळाला होता़आता यावर्षी देखील अशाच पध्दतीने निधी वाटप होणार आहे़ यासाठी तालुकानिहाय कामांची मागणी करण्यात आली असून चढत्या क्रमाने निधी वाटप केले जाणार आहे़ ज्या गावांना आतापर्यंत निधीच मिळाला नाही, ज्या गावांना अत्यल्प निधी मिळाला अशा गावांना प्राधान्य दिले जाणार आहे़ दरम्यान गटनेते मदनराव चव्हाण यांनी सांगितले की, निधी वाटपात वंचित गावांना न्याय मिळत असेल तर ही चांगलीच बाब आहे़ कामांसाठी आर्थिक व्यवहार करु नयेत, असे आवाहन त्यांनी केले़अनुशेष भरुन निघेलसमाजकल्याण कडून येणारा निधी योग्य पध्दतीने खर्च झाला पाहिजे़ त्यासाठी दोन वर्षापूर्वी आॅनलाईन प्रक्रिया राबविली होती़ यावर्षी ही प्रक्रिया राबविण्याची गरज पडेल, असे वाटत नाही़ कारण बहुतांश पदाधिकाऱ्यांनी सूचविलेली कामे निकष पूर्ण करुनच सूचविली आहेत़ पदाधिकाऱ्यांचे सहकार्य आहे त्यामुळे निधी वाटप योग्य पध्दतीने होईल, असा विश्वास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ अशोक कोल्हे यांनी व्यक्त केला़