शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक झाशीची राणी ! एसटी संपामुळे विद्यार्थिनीची शाळेसाठी दररोज १० किमीची घोडेस्वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 14:22 IST

शाळेसाठी दररोज कांगणेवाडी ते उजनी घोड्यावरून प्रवास करणाऱ्या माधवीच्या धाडसाचे होतेय कौतुक

- अविनाश मुडेगांवकर

अंबाजोगाई (जि. बीड) : पूर्वीच्या काळात कुठलेच वाहन नसल्याने दुसऱ्या गावाला जाण्यासाठी घोड्यावरून जावे लागत असे. आता पुन्हा ते जुने दिवस येतात की काय? असे झाले आहे. एसटीच्या संपामुळे बस बंद असल्याने कांगणेवाडीच्या (ता. अंबाजोगाई) विद्यार्थिनीला उजनीला शाळेत जाण्यासाठी चक्क घोड्यावर बसून पाच किलोमीटर जावे लागत आहे. शाळा सुरू झाल्यापासून तिने शाळा ते घर अशी दररोजची १० किमी घोडेस्वारी सुरू केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बस बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेपासून पर्यायाने शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. परंतु कांगणेवाडी येथील माधवी कांगणे या विद्यार्थिनीने बस कधी सुरू होतील, याची वाट न बघता आपल्या घरच्या घोड्यावरच शाळेचा रस्ता धरला आहे. माधवीच्या या धाडसाचे शिक्षणाधिकारी चंदन कुलकर्णी, शाळेचे पर्यवेक्षक आर. एन. लोमटे, शिक्षक लालासाहेब गायकवाड आदींनी कौतुक केले.

घोडेस्वारीचा जोपासला छंदकांगणेवाडी येथील माधवी दशरथ कांगणे हिला लहानपणापासूनच घोडेस्वारीचा छंद आहे. तिच्या गावात फक्त चौथीपर्यंतच शाळा आहे. त्यामुळे तेथील सर्व विद्यार्थ्यांना पुढील माध्यमिक शिक्षणासाठी पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या उजनी या गावी जावे लागते. कोणी बसने तर कोणी सायकलवर या शाळेत जातात. माधवी आपल्या वडिलांबरोबर दुचाकीवर तर कधी बसने उजनीच्या सिध्देश्वर विद्यालयात जात होती. यावर्षी ती सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. परंतु सध्या बसही बंद आहेत अन् पेट्रोलही महागले आहे. त्यामुळे तिने रणरागिणीसारखे धाडस करीत आपल्या घोड्यावरच शाळेत जाण्याचा निर्णय घेतला.

वडिलांनीच दिले धडेमाधवीचे वडील दशरथ कांगणे यांना जेमतेम एक एकर जमीन आहे. शेळी पालनाचाही ते व्यवसाय करतात. पूर्वीपासूनच त्यांना घोडे सांभाळण्याचा छंद आहे. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. या दोन्ही मुलांना त्यांनी लहान वयातच घोडेस्वारीचे धडे दिले आहेत. त्यामुळे माधवीला लहानपणापासून लगाम हातात धरणे, घोड्यावर बसणे याची सवय आहे. माळेगावच्या यात्रेतून त्यांनी ही घोडी आणली होती. त्यावेळी ती आठ महिन्यांची होती. तिचा सर्वात जास्त सांभाळ व पालन पोषण माधवीनेच केले आहे. तिच्या शिक्षणात अडचणी येऊ नयेत म्हणून घोड्यावर शाळेत जाण्याची परवानगी दिल्याचे दशरथ कांगणे यांनी सांगितले.

बाजूच्या शेतात बांधते घोडामेट्रो शहरातील मुले चित्रात किंवा व्हिडिओत घोडे पाहत असतात. काही जणांना रेसकोर्सवर गेल्यावरच घोडा बघायला मिळतो. परंतु उजनीच्या मुलांना माधवीने आणलेला घोडा रोज बघायला मिळतो. शाळेत येण्यापूर्वी ती आपल्या घोड्याला शाळेच्या शेजारीच असलेल्या शेतातील गोठ्यात बांधते. त्यानंतर शाळेत प्रवेश करते. मात्र, माधवीच्या या धाडसाचे सर्वजण कौतुक करतात.

जबाबदारी पालकांचीचमाधवीच्या वडिलांनी घोड्यावर शाळेत जाण्यासाठी संमती दिली आहे. बसही बंद आहेत. पालकांच्या जबाबदारीवर तिला शाळेत येण्यास परवानगी दिल्याचे शाळेचे मुख्याध्यापक डी. एस. बंडगर यांनी सांगितले.

माधवीला शाळेची ओढकोरोनामुळे बरेच दिवस झाले शाळा बंद आहेत. शाळा कधी सुरू होतात. अन् कधी एकदाची शाळेत जाते याची ओढ लागली होती. परंतु आता पुन्हा बस बंद आहेत. त्यामुळेच घोड्यावर शाळेत जाण्याचा निर्णय मी घेतला, असे माधवीने सांगितले.

टॅग्स :BeedबीडEducation Sectorशिक्षण क्षेत्रST Strikeएसटी संप