शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

केज तालुक्यात विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:34 IST

केज : तालुक्यातील पिंपळगाव घोळवे येथील एका विवाहितेला गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये म्हणून सासरच्या मंडळींनी शारीरिक व ...

केज : तालुक्यातील पिंपळगाव घोळवे येथील एका विवाहितेला गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये म्हणून सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शोभा रामहरी गायकवाड (वय ३०) या विवाहित महिलेस २२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास तिच्या सासरच्यांनी माहेरहून गाडी घेण्यासाठी पैसे घेऊन ये म्हणून मारहाण केली. हा छळ मागील काही दिवसांपासून सतत सुरू होता. या त्रासाला कंटाळून शोभा हिने विषारी औषध प्राशन केले असता तिला उपचासाठी अंबाजोगाई येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार सुरू असताना शोभा हिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयत शोभा गायकवाडची आई तारामती कोंडीराम भुसारे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात शोभा हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयत शोभाचा नवरा रामहरी बालू गायकवाड, सासरा बालू रावसाहेब गायकवाड, दीर किशोर बालू गायकवाड, हिंमत बालू गायकवाड, जाऊ सविता गायकवाड, नणंद लता गणेश कुटे या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीराम गायकवाड करीत आहेत.