शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’तर्फे आजपासून रक्तदानाचा महायज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST

बीड : ‘लोकमत’तर्फे बीड येथे २ जुलै रोजी ‘लोकमत - रक्ताचं नातं’ या महारक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले ...

बीड : ‘लोकमत’तर्फे बीड येथे २ जुलै रोजी ‘लोकमत - रक्ताचं नातं’ या महारक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. जालना रोडवरील बीड ब्लड बँकेत (पहिला मजला, हरिओम कॉम्प्लेक्स, द्वारकादास मंत्री बँकेशेजारी) सकाळी १० वाजता हे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. स्वातंत्र्यसेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांची २ जुलै रोजी जयंती आहे. त्याप्रीत्यर्थ बीडसह राज्यात १५ जुलै २१ पर्यंत रक्तदान शिबिरे होणार असून दात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन ‘लोकमत’तर्फे करण्यात येत आहे.

रक्तदान म्हणजे जीवनदान. कोरोनाच्या प्रादुर्भावाने निर्बंध लागल्याने रक्तदान शिबिरे थांबली. परिणामी शस्त्रक्रियांसह अनेक उपचारांत रक्ताचा पुरेसा साठा नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. कोविड संकटाच्या काळात रक्ताच्या तुटवड्यामुळे रुग्णांचीही गैरसोय होत आहे. अनेकांना रक्ताची गरज भासते. या परिस्थितीत वेळेत रक्तदाता मिळणे व त्याचा रक्तगट जुळविणे हे अतिशय जिकिरीचे काम आहे. गरजू रुग्णांना जीवदान देण्यासाठी रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज आहे, तरच खऱ्या अर्थाने कोणाला तरी जीवनदान अर्पण करू शकतो.

रक्तपेढ्यांना रक्ताच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णावर उपचार करतानाही अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सामाजिक दायित्व म्हणून रक्तदानासाठी पुढाकार घेतला आहे. यात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून रक्तदानाची एक लोकचळवळ उभी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

यांनी करावे रक्तदान

१८ ते ६० वयोगटातील व्यक्ती.

कोविड निगेटिव्ह झाल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येते.

लसीचा पहिला अथवा दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करता येते.

परळी आणि अंबाजोगाई आदी ठिकाणी ही रक्तदान शिबिरे होणार आहेत. सामाजिक संस्था, पक्ष, संघटना, विविध मंडळे यांना जर रक्तदान शिबिरे घेऊन या महायज्ञात सहभागी व्हायचे असेल तर त्यांनी पुढील मोबाईल क्रमांकावर लोकमतशी संपर्क साधावा. जर आपण रक्त देण्यास इच्छुक असाल तर आपले नाव, नंबर, शहर, पत्ता या ९६५७१०२१७८ या नंबरवर व्हॉट्स‌ॲप करा, आम्ही आपल्याशी संपर्क साधू.