शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथालयाचे अनुदान रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:32 IST

... बस सुरू करण्याची मागणी बीड : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून बससेवा बंद आहे. यामुळे परगावी, परजिल्ह्यात जाणाऱ्या नागरिकांची ...

...

बस सुरू करण्याची मागणी

बीड : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून बससेवा बंद आहे. यामुळे परगावी, परजिल्ह्यात जाणाऱ्या नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनाही बाजारपेठेत जाण्यासाठी मोठी अडचण होत आहे. १ जूनपासून कडक निर्बंध घालून बससेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

...

पेरणीची तयारी जोरात

कडा : आष्टी तालुक्यात कडा परिसरात शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीची तयारी केली आहे. कोरोनामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. उधार, उसनवारी करून शेतकऱ्यांनी शेती मशागत केली आहे. आता खते, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे.

....

पिण्याच्या पाण्याची टंचाई

आष्टी : तालुक्यातील डोंगरपट्ट्यातील अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. विहिरी, बोअरवेलची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे. जनावरांच्या पाणी, चाऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे आता सर्वांना पावसाची आस लागली आहे.

...

रानडुकरांचा उपद्रव वाढल्याने शेतकरी चिंतेत

पाटोदा : तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी यंदा भरपूर पाणी उपलब्ध असल्याने भुईमूग पिकाची लागवड केली होती; परंतु तालुक्यातील डोंगरपट्ट्यात रानडुकरांचा उपद्रव वाढल्याने एका रात्रीत शेतकरी भुईमूग पिके फस्त करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

...

रोजगार हमीची कामे सुरू करा

धानोरा : गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना लॉकडाऊन सुरू आहे. अनेकांना रोजगार मिळणे मुश्कील झाले आहे. यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लाॅकडाऊन उठताच रोजगार हमीची कामे सुरू करावीत, अशी मागणी होत आहे.

...

डासांमुळे आरोग्य धोक्यात

बीड : शहरात डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यात उकाडा वाढला आहे. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार होण्याची चिन्हे आहेत. पावसाळ्यापूर्वी नगर परिषदेने शहरात स्वच्छता मोहीम राबवावी, तसेच फवारणीची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

...

चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

धानोरा : परिसरात विहीर, बोअरवेलवरील मोटारी, केबल मोठ्या प्रमाणात चोरी जात आहे. अनेक शेतकऱ्यांचे केबल चोरी गेले आहे. किरकोळ कारणासाठी शेतकरी चोरीची तक्रार देण्यास जात नाहीत; परंतु आर्थिक नुकसान शेतकऱ्यांंना सहन करावे लागत आहे. या चोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.