शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

गावात मुक्कामी राहणारी लालपरी दीड वर्षापासून स्थानकातच उभी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:35 IST

बीड : काेरोनाच्या धक्क्यातून राज्य परिवहन महामंडळ अद्यापही बाहेर पडलेले नाही. ग्रामीण भागातील गावांमध्ये ७४ बस मुक्कामी थांबत होत्या. ...

बीड : काेरोनाच्या धक्क्यातून राज्य परिवहन महामंडळ अद्यापही बाहेर पडलेले नाही. ग्रामीण भागातील गावांमध्ये ७४ बस मुक्कामी थांबत होत्या. यातील केवळ ३१ चालू असून तब्बल ४३ बस मागील दीड वर्षापासून बसस्थानकातच उभ्या आहेत. शहरांतील बससेवा सुरळीत होत असली तरी ग्रामीण प्रवाशांना अद्यापही खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागत आहे.

जिल्ह्यात आठ आगार आहेत. प्रत्येक आगारातून ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी बस सोडल्या जातात. तसेच ज्या गावातून अथवा मार्गावर प्रवासी संख्या अधिक आहे, अशा ठिकाणी बस मुक्कामी पाठविल्या जातात; परंतु मागील दीड वर्षापासून लालपरीची चाके कोरोनामुळे रुतलेलीच आहेत. काही दिवसांपूर्वी बस रस्त्यावर दिसू लागल्या असल्या तरी ग्रामीण मार्गावर धावणाऱ्या बसची संख्या तुटपुंजी आहे. त्यामुळे ग्रामीण प्रवाशांना आजही पायपीट अथवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यात त्यांची आर्थिक लूट होत असून अपघाताची शक्यताही वर्तविली जात आहे. हे सर्व टाळण्यासाठी रापमने योग्य नियोजन करून ग्रामीण भागात बससेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक

बससेवा बंद असल्याने ग्रामीण प्रवाशांना रिक्षा, जीप आदी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. हे वाहनधारक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवत असल्याने अपघाताचा धोका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शाळा बंद असल्याचाही फटका

शाळा बंद असल्याने मानव विकासच्या बसही इतर मार्गावर धावत आहेत. शाळा सुरू झाल्यास परिवर्तनसह मानविकास, शिवशाही बसमध्ये बसणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढेल. याचा फायदा रापम व प्रवाशांना होणार आहे.

---

ग्रामीण भागात कोरोना अगोदर ७४ बस धावत होत्या. सद्यस्थितीत ३१ बस मुक्कामी थांबत आहेत. टप्प्याटप्प्याने बस वाढविल्या जात आहेत. शाळा बंद असल्याचा परिणाम होत आहे.

एस.बी.पडवळ, वाहतूक अधिकारी रापम बीड

---

अशी आहे आकडेवारी

आगार पूर्वीआता

बीड १५ ८

परळी ११ ५

धारूर ५२

माजलगाव८४

गेवराई ७३

पाटोदा ८१

आष्टी १२ ३

अंबाजोगाई८५

एकूण ७४ ३१