शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

अनियमितता भोवली; तीन कर्मचाऱ्यांची सेवासमाप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:24 IST

बीड : रोहयोच्या कामकाजात हलगर्जीपणासह अनियमिततेचा ठपका ठेवत शिरूर कासार, गेवराई येथील पंचायत समिती कार्यालयातील तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांची ...

बीड : रोहयोच्या कामकाजात हलगर्जीपणासह अनियमिततेचा ठपका ठेवत शिरूर कासार, गेवराई येथील पंचायत समिती कार्यालयातील तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा कायमची समाप्त करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी गुरुवारी केली. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

या कारवाईत शिरूर कासार पंचायत समिती कार्यालयातील कंत्राटी क्लार्क व डाटा एन्ट्री ऑपरेटर सय्यद आमीर यांच्यासह गेवराई पंचायत समितीमधील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रशांत शरद कोटुळे व महादेव संभाजी येवले या तिघांचा समावेश आहे. यातील सय्यद आमीर यांनी शिरूर कासार तालुक्यातील रोहयोच्या कामांची देयके एकाच खात्यावरून अनेकांना प्रदान केली होती. तसा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांनी ६ जुलै रोजी सादर केल्यावरून अनियमिततेचा ठपका ठेवत मुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार यांनी सय्यद यांच्या सेवा समाप्तीचे आदेश दिले.

तसेच, प्रशांत कोटुळे, महादेव येवले यांनी गेवराई तालुक्यातील रोहयोच्या कामांवरील मस्टर निर्गमित न करणे, वेळेवर ऑनलाईन न करणे, वेळेवर मजुरी प्रदान न करणे अशा प्रकारे दैनंदिन कामकाजात हलगर्जीपणा केला होता. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांनी कामकाज सुधारण्याच्या वारंवार सूचना देऊनही हलगर्जीपणा कायम होता. तसेच, या दोघांच्याही कामाचा प्रगती अहवाल असमाधानकारक असल्याने ते कामकाज करण्यास सक्षम नसल्याचे गृहीत धरून दोघांविरोधात कर्तव्यात कसूर व हलगर्जीपणाचा ठपका ठेवत थेट सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत.

यांना मिळणार नाही पुन्हा काम

या कारवाई झालेल्या तिघांनाही जिल्हा परिषदेअंतर्गत व इतर कोणत्याही विभागाच्या कंत्राटी तत्त्वावरील पदावर घेण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. याबाबतचे आदेशही मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत. या गंभीर कारवाईमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामकाजात सुधारणा होण्यास मदत होणार आहे.