शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाची तीव्रता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST

रस्त्यावरच्या फांद्या ठरताहेत धोकादायक अंबाजोगाई : ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर रस्त्याच्या दुतर्फा बाजूने अनेक मोठमोठी काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात ...

रस्त्यावरच्या फांद्या ठरताहेत धोकादायक

अंबाजोगाई : ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर रस्त्याच्या दुतर्फा बाजूने अनेक मोठमोठी काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. या झाडांच्या फांद्या रस्त्यालगत येत आहेत. त्यामुळे मोठ्या वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने फांद्या तोडून रस्ता सुरक्षित करून देण्याची मागणी होत आहे.

पालसिंगण परिसरात हातपंप नादुरुस्त

बीड : तालुक्यातील पालसिंगण परिसरातील हातपंप नादुरुस्त आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागलेली असताना हातपंप दुरुस्त करून घ्यावेत, ज्यामुळे पाणीटंचाई जाणवणार नाही, अशी मागणी परिसरातील गावकऱ्यांमधून केली जात आहे.

दुर्लक्षामुळेे वाढतोय संसर्ग

वडवणी : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांना प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देऊनही लोक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे. चार दिवसांपूर्वी कारवाईची मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर दुर्लक्ष झाल्याने विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलीस व महसूल प्रशासनाने कडक पावले उचलण्याची मागणी केली जात आहे.

काळाबाजार रोखण्यासाठी पथके

बीड : पावसाळा पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. शेतकरी ही खरिपाच्या तयारीसाठी सज्ज झाला आहे. यंदा बियाणांचा काळाबाजार होण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात भरारी पथकांची नेमणूक केली आहे. तरी व्यापाऱ्यांनी योग्य किमतीत शेतकऱ्यांना बियाणे द्यावे, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा तालुका कृषी विभागाने दिला आहे.

कडा येथील पुलाची दुरुस्ती करा

आष्टी : आष्टी तालुक्यातील कडा येथे नगर-बीड रोडवर असलेल्या पुलाची मोठी दुरवस्था झाली आहे. हा पूल आता कालबाह्य झाला आहे. पुलाचे कठडे तुटले आहेत. या पुलावरुन मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

विद्युत पंपांची चोरी वाढली

बीड : जिल्ह्यात जवळपास सर्वच ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पंप चोरीस जाण्याचे प्रकार वाढले आहेत. विद्युत पंपाच्या किमती वाढल्या आहेत. त्यात पंप चोरीला गेला तर त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे या चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

कडेकोट पोलीस बंदोबस्त

अंबाजोगाई : तालुक्यात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे कडेकोट बंदोबस्त प्रत्येक चौकात तैनात ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये म्हणून पोलिसांच्या व्हॅन गस्त घालू लागल्या आहेत. तर ग्रामीण भागातही ग्रामीण पोलीस ठाणे, बर्दापूर पोलीस ठाणे यांच्या वतीने गावोगावी गस्त सुरू असून ग्रामीण भागातही आवश्यकतेप्रमाणे पोलीस यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे.

बिनव्याजी कर्ज देण्याची मागणी

वडवणी : तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पेरणीसाठी बिनव्याजी ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अवकाळी, नैसर्गिक व कोरोनाच्या संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना आगामी खरिपातील पेरणीसाठी ३ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्यात यावे, अशीही मागणी आहे.