बांध स्वच्छ ठेवल्यास गोगलगायी लपणार नाहीत
शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत, त्यामुळे गोगलगायींना लपण्यास जागा राहणार नाही. प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रात आच्छादन करण्याचे टाळावे. सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या पाण्यात बुडवून माराव्यात.
शेतामध्ये किंवा बागेमध्ये ७ ते ८ मीटर अंतरावर विविध ठिकाणी वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाला पिकाच्या अवशेषाचे ढीग ठेवावेत. गोगलगायी दिवसा त्या ठिकाणी आश्रयाला जातात. सूर्यास्तापूर्वी त्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करून नष्ट करावीत.
शेत किंवा बागेच्या सभोवती बांधापासून आत तंबाखू भुकटीचा ५ सें.मी. रुंदीचा पट्टा गोगलगायींना शेतात जाण्यास प्रतिबंध म्हणून व नियंत्रणासाठी टाकावा. कीडनाशकांचे विषारी आमिष तयार करताना ५० किलो गव्हाचा भुसा, कोंडा अधिक २५ ग्रॅम यीस्ट एकत्र करून गुळाच्या द्रावणात (२०० ग्रॅम गूळ अधिक १० लिटर पाणी) १२ ते १५ तास भिजवावे.
त्यामध्ये मेटाल्डीहाइड (२.५ टक्के) ५० ग्रॅम मिसळावे. हे आमिष शेतामध्ये ढिगाच्या स्वरूपात किंवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरूपात टाकावे, तसेच विषारी आमिष बनविण्यापूर्वी कीटकनाशक हाताळताना चेहरा, डोळे, किंवा शरीराचे संरक्षण करण्यासाठी संरक्षक पोशाख, हातमोजे, चष्मा आदींचा वापर करावा, असे आवाहन कीटक शास्त्रज्ञ डॉ. भैयासाहेब गायकवाड यांनी केले.
===Photopath===
270621\sakharam shinde_img-20210626-wa0044_14.jpg~270621\sakharam shinde_img-20210626-wa0043_14.jpg