शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
3
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
4
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
5
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
6
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
7
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
9
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
10
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
11
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
12
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
13
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
14
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
15
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
16
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
17
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
18
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
19
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
20
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा

स्पर्धा परीक्षेतून परळीचा नावलौकिक वाढवा - पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 01:16 IST

तरूणाईमध्ये खूप मोठी ताकत आहे, हे ओळखून आजच्या तरूणांनी आत्मविश्वासाने स्पर्धा परिक्षांना सामोरे जाऊन परळी शहराचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : तरूणाईमध्ये खूप मोठी ताकत आहे, हे ओळखून आजच्या तरूणांनी आत्मविश्वासाने स्पर्धा परिक्षांना सामोरे जाऊन परळी शहराचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ महाविद्यालयात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निधीतून बांधलेल्या खुले व बंदिस्त क्रीडा संकुल, मुलींच्या वसतीगृहाची नवीन इमारत तसेच लोकनेते गोपीनाथराव मुंडे अकॅडमीचे उद्घाटन रविवारी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय वक्ते प्रा. आनंद मुन्शी, नांदेडचे प्रा. विष्णू घुगे, जवाहर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जुगलिकशोर लोहिया, उपाध्यक्ष फुलचंद कराड, डॉ. दे. घ. मुंडे, सचिव दत्ताप्पा इटके, सुरेश अग्रवाल, कैलास घुगे, डॉ. हरिश्चंद्र वंगे, डॉ. शालिनी कराड, शांतीलाल जैन, प्राचार्य आर. के. इप्पर तसेच संस्थेचे सर्व संचालक, उपस्थित होते.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, साहेबांच्या नावाने सुरू केलेल्या अकॅडमीतील विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश आणि कॉलेजची दशा व दिशा बदलल्याचे पाहून आनंद झाला. येथील शैक्षणिक वातावरण चांगले व्हावे हेच मुंडे साहेबांचे स्वप्न होते. परळी व बीड जिल्हयाची मान उंच व्हावी यासाठी मी सध्या काम करत आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी आनंदी तर रहाच पण सहनशीलताही ठेवा असे आवाहन त्यांनी केले. या वेळी प्रसिद्ध साहित्यिक प्रा. मधु जामकर, प्रा. पी. एल. कराड, प्रा. राठोड, प्रा. माधव रोडे, प्रा. गायकवाड, प्रा. जी. एस. चव्हाण, प्रा. वैरागडे, प्रा. सुर्यवंशी, प्रा. संतोष श्रीवास्तव यांचा सत्कार करण्यात आला.सूत्रसंचालन प्रा. नयनकुमार विशारद यांनी केले तर प्रा. जगतकर यांनीआभार मानले. या कार्यक्रमास प्राध्यापक तसेच विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती.

६४ विद्यार्थी संरक्षण सेवेतवैद्यनाथ महाविद्यालयातील ६४ विद्यार्थी खडतर मेहनतीने संरक्षण सेवेत गेले आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे अकॅडमीतर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परिक्षांमध्ये काही विद्यार्थ्यांनी लाखाची शिष्यवृत्ती मिळवली आहे, हे विद्यार्थी शहरातील विविध शाळामधील आहेत, ही निश्चितच भूषणावह बाब आहे, शहराचे शैक्षणिक वातावरण आता बदलत आहे असे पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी त्यांच्या हस्ते संबंधित विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा गौरव करण्यात आला.

व्याख्यानाने नवचैतन्यअहमदाबाद येथील आंतरराष्ट्रीय किर्तीचे वक्ते प्रा. आनंद मुन्शी यांनी यावेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे उपस्थित पाच हजार विद्यार्थी - विद्यार्थिनींमध्ये नवचैतन्य संचारले.यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी, धाडस, कठोर मेहनत, आत्मविश्वास आदी गुण आत्मसात करावे, स्वत:ला खोटे बोलून फसवू नका, मोबाईल आणि इंटरनेटचा वापर टाळा असे आवाहन त्यांनी केले.